पुलावर ट्रेलर दुचाकीचा भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : अचानक ट्रेलरसमोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून त्यात संपूर्ण अपघात रेकॉर्ड झाला आहे. योगेश रिठे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात काटोल तालुक्यातील सावरगाव जांब नदीच्या पुलावर घडला. मृतक योगेश रिठे याचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सुखी कुटुंबाचे स्वप्न रंगवत असताना अचानक त्याच्यावर काळाने झडप घातल्याने संपूर्ण रिठे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.