‘गॅस कटर’ने एटीएम फोडण्याच्या प्रयत्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : जरिपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जिंजल मॉल रोडवरील कॅनरा बॅकेची एटीएम मशीन चोरट्याने गॅस कटरद्वारे फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एटीएमला आग लागल्याने चोरट्यांनी गॅस कटर ठेऊन पसार झाले. ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (ता.२९) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरिपटका परिसरात असलेल्या मेकोसाबाग कब्रस्तान जवळ असलेल्या जिंजल मॉल रोड येथे कॅनरा बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता दुचाकीवरुन तीन युवक तेथे आले. त्यांच्या जवळ गॅस कटर, सिलींडर आणि एटीएम कापण्यासाठी लागणारे विविध उपकरणे होती.
त्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीवर कपडा टाकला. त्यानंतर गॅस कटर आणि इतर उपकरणांच्या साह्याने मशीन कापत होते. खुप खटाटोप केल्यावर आरोपी एटीएमच्या लॉकरपर्यंत पोहोचले. दरम्यान गॅस कटरमुळे एटीएमला आग लागली. ही आग पसरेल या भितीने चोरटे तिथून पसार झाले. सकाळच्या सुमारास नागरिकांना एटीएममध्ये काहीतरी जळाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी एटीएमची पाहणी केली. तिथे गॅस कटर आढळून आले. यावेळी बँकेच्या मदतीने तेथील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली असता, त्या ठिकाणी तीन जणांनी शिरुन एटीएम गॅस कटरने फोडण्याच्या प्रयत्न केल्याची बाब समोर आली.
सकाळी पाहणी, पहाटे प्रयत्न पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, यात आरोपी ११ वाजता परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपीने बराच वेळ एटीएम आणि परिसराची पाहणी केल्याचे दिसून आले. त्यानंतर तिघेही पहाटे ३ वाजता एटीएम फोडण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आले. यातील एक आरोपी सरदार आहे. दुचाकीचा नंबर न मिळाल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. जरिपटका परिसरात असलेल्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मध्यरात्री सुनसान रस्त्याच्या फायदा घेऊन कॅनरा बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब दिसून आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *