महापुरुषांच्या विचार प्रसाराकरिता महावितरणकडून स्टडी रूम उपक्रम

नागपूर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याकरिता महावितरणच्या सहाय्यक अभियंता, बुटीबोरी ग्रामीण कार्यालयतर्फे स्टडी रूम या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन १० एप्रिलला बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता गाणार, उपकार्यकारी अभियंते गवते व चरपे प्रामुख्याने उपस्थित होते.
ही स्टडी रूम सहाय्यक अभियंता बुटीबोरी ग्रामीण कार्यालयात १५ एप्रिल २०२३ पर्यंत रोज संध्याकाळ ७ वाजे पर्यंत सुरू राहणार आहे. या स्टडी रूम मध्ये महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांची ३६ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. स्टडी रूमच्या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुटीबोरी ग्रामीण कार्यालयचे सहायक अभियंता शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ तंत्रज्ञ धर्मपाल चोकांद्रे व आभार प्रदर्शन प्रधान तंत्रज्ञ केशव सूर्यवंशी यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *