महावितरणच्या तंत्रद्यानास मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या तंत्रद्यानास शिवीगाळ व मारहाण करून धमकी देण्याची घटना बिनाकी उपविभाग येथील महावितरणच्या कार्यालयात घडली.या प्रकरणी आरोपी पिंटू शाहू व त्याच्या सहकारी पवन राऊत या दोघांविरुद्ध पाचपावली पोलीस स्टेशन येथे भादंवि ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६ व ३४ कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरतेने दाखल घेत दोन्ही आरोपीना तातडीने अटक केली आहे. महावितरणच्या बिनाकी उपविभाग कार्यालयात राजेंद्र रंगाराव मंथनवार हे वायरमन म्हणून कार्यरत आहेत. काल मंगळवारी ७ फेब्रुवारीला त्यांनी शाहू मोहल्ला बिनाकी येथील कोलबास्वामी नगर मध्ये राहणारे ग्राहक श्रीमती चंदाबाई कांताप्रसाद शाहू यांच्या घरी दोघांना अटक बिलाची थकबाकी असून ती ४ हजार ४१० रुपये असल्याची माहिती दिली तसेच हे वीज बिल न भरले तर आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल अशी पूर्व सूचनाही दिली. या घटनेचा राग धरून श्रीमती चंदाबाई कांताप्रसाद शाहू यांचा मुलगा पिंटू शाहू व त्याचा सहकारी पवन राऊत हे दोघे आज बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयात आले व त्यांनी राजेंद्र मंथनवार यांना शिवीगाळ व मारहाण करून धमकी दिली. तसेच या घटनेचे चित्रीकरण करणाºया कर्मचाºयांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी राजेंद्र मंथनवारयांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस स्टेशन येथे भादंवि ३५३,३३२,२९४,५०४,५०६ व ३४ कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दाखल घेत दोन्ही आरोपीना अटक केली आहे. दोघांना अटक

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *