मधमाशांच्या हल्ल्यात २५ पर्यटक जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागभीड : तळोधी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणा-या गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) येथे पर्यटनासाठी आलेल्या नागपुरातील २५ पर्यटकांवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास हल्ला केला. यात २५ पर्यटक जखमी झाले. जखमींपैकी काही पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे. शंकरपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अनेक जखमी नागपुरात गेले. यापूवीर्ही येथे हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नागपूरची टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी येथील स्थानीक लोकांशी संगनमत करून ३ ते ४ हजार रुपयात लोकांना ट्रॅकिंगसाठी नागभीडला घेऊन येते. ८ एप्रिल २०२३ ला मधमाशांच्या हल्ल्यात २ जणांना जीव गमवावा लागला होता, तर ५ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर वनविभागाने येथे प्रवेश बंद करून बॅरिकेटस लावले होते. २०१३१४ मध्ये एका घटनेत १० जण गंभीर जखमी झाले होते.

मधमाशांच्या हल्यात एका पर्यटकाचा डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी येथे आलेल्या उमरेड आणि नागपूरच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याने बेशुद्धावस्थेत वाचवण्यात आले. गडचिरोलीतील काही पर्यटकांवरही मधमाशांनी हल्ला केला होता. या परिसरात मधमाशांचे अनेक पोळे असल्याचे सांगितले जाते. तरीही पर्यटक येथे येतात. मधमाशांच्या डंखामुळे अनेक पर्यटक जखमी होऊन परतात. येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथे कडक बंदी घालावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *