शासकीय इमारतीसमोरील अनधिकृत केंद्रांवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : येथील प्रशासकीय इमारतीसमोर अनधिकृतपणे महाआॅनलाईन व जनसुविधा केंद्र चालविण्यात येत होती. तालुका महसूल प्रशासनाने या अनधिकृत केंद्रांवर कारवाई केली असून केंद्र परिसरातून १६ दुकाने हटविण्यात आली आहे. तहसीलदार रमेश कोळपे यांच्या निदेर्शानुसार नायब तहसीलदार बाळुताई भागवत यांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिस जमादार पुंडलीक वैरागडे व दिनेश अटेल यांचा सहभाग होता. प्रशासकीय इमारतीसमोर रस्त्यावर अनधिकृतपणे अनेकांनी सेवा देणारी दुकाने थाटली होती. यामुळे इमारतीसह येथे येणाºयांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

अनधिकृतपणे महाआॅनलाईन व जनसुविधा केंद्र चालविणे कारवाईस पात्र आहे. त्यामुळे असे केंद्र चालविल्याचे आढळून आल्यास केंद्र चालकाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार रमेश कोळपे यांनी कळविले आहे. नागरिकांनी प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी आपले अर्ज अधिकृत महाआॅनलाईन व जनसुविधा केंद्रावरूनच सादर करावे, असे आवाहन तहसीलदार कोळपे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *