भरधाव ट्रकची पोलीस मदत केंद्राच्या वाहनाला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाºया महामार्ग पोलिसांच्या वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात एका पोलीस कर्मचाºयाचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. आर्णीमहागाव दरम्यान कोसदनी घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात महामार्गावर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस संजय रंगराव नेटके (३०) रा. शिवाजी वॉर्ड, पुसद यांचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. महामार्ग पोलीस ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यावेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेले पोलीस कर्मचारी संजय नेटके हे तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. संजय नेटके हे होमगार्डच्या कोट्यातून पोलीस शिपाई पदापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *