युवाशक्ती संघटनेतर्फे शिवजन्मोत्सव साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : युवाशक्ती संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त भंडारा शहरातील चांदणी चौक येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भंडारा शहरात भृशुंड ढोल ताशा व ध्वज पथक आणि फाऊंडेशन भंडारा, युथ फॉर नेशन, हिंदवी प्रतिष्ठान भगवा ग्रुप, युवाशक्ती संघटना, संभाजी महाराज प्रतिष्ठान, असर फाऊंडेशन, बालमित्र माँ शारदा उत्सव मंडळ, वरदविनायक गणेश उत्सव मंडळ भंडारा यांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. सदर बाईक रॅलीचे स्वागत चांदणी चौक येथे युवाशक्ती संघटनेतर्फे करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या वतीने चांदणी चौक येथे मठ्ठा वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.

रविवारी सकाळी ९ वाजता युवाशक्ती संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन राज्याभिषेक करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ,जय शिवरायह्ण, अशा शिव गर्जना करीत चांदणी चौक परिसर दणाणून सोडला. यावेळी गृपचे अध्यक्ष गोवर्धन निनावे, राकेश खेडकर, कुणाल बोकडे, गौरव पारवे, सुर्यांश भंडारी, भुषण देशमुख, कृपाल तांडेकर, अनमोल पारवे, सौरव तांडेकर, बबलू खंडाईत, विक्की सोनवाने, सागर असाटी, रवी खेडकर, शुभम सोनवाने, प्रद्युम्न्य निनावे, योगेश कोहाड, आदित्य चौधरी, गौरव चोपकर, यश अंबाळकर, आकास सोनवाने, भुरे मामा व युवाशक्ती संघटनेचे ईतर कार्यकर्ते प्रामख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात भंडारा शहरातील तमाम शिवभक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली होती व सर्व कार्यक्रम शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्यात आले. या शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते रॅलीत सहभागी झालेले महिलावर्ग तसेच युवा तरुणवर्ग.

भंडारा शहरातील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून बाईक रॅली काढण्यात आली व प्रत्येक चौका चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व रॅलीचे स्वागत करण्यात आले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासुन रॅलीला सुरवात करण्यात आली व नंतर संताजी वार्ड मध्ये रॅलीचे स्वागत व प्रतिमेला माल्याअर्पण करण्यात आले. नंतर चांदनी चौक मध्ये युवा शक्ती संघटना तर्फे रॅलीचे स्वागत व प्रतिमेला माल्याअर्पण करण्यात आले. गांधी चौक दुर्गा माता गेट जवळ रॅलीचे स्वागत व प्रतिमेला माल्याअर्पण करण्यात आले. नंतर खात रोड नहराजवळ रॅलीचे स्वागत व प्रतिमेला माल्याअर्पण करण्यात आले व शेवटी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मोटार सायकल रॅलीचे समापन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *