यु टर्न घेत असलेल्या ट्रकला मोटरसायकलची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया ते कारंजा मार्गावर एक ट्रक यु टर्न घेत असताना मोटरसायकलची धडक झाल्याने ट्रक च्या मागच्या टायर मध्ये मोटरसायकल अडकली असुन या धडकेत दोन्ही मोटरसायकल गंभीररित्या जखमी झाले. असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रफुल बारमन २३ वर्ष व मुकेश बारमैया २४ वर्ष दोघे हि रा. सिवनी मध्य प्रदेश असे जखमीचे नाव असुन प्रफुल बारमन याची प्रकृती चिंता जनक असल्याचे बोलले जात आहे. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. मोटरसायकल वरील दोन्ही युवक हे कारंजा येथून काल रात्री गोंदिया कडे येत असताना होरा पेट्रोल पंप समोर एक ट्रक यु टर्न घेत असताना त्यांच्या कारंजा कडून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटरसायकलने त्या ट्रक च्या मागच्या बाजूला धडक दिली धडक इतकी जोरदार होती कि मोटरसायकल ट्रक च्या मागच्या दोन टायरच्या मधात जाऊन अडकली व दोन्ही युवक खाली पडले असुन जबर मार लागल्याने रित्या जखमी झाले आहेत. हे दोघे युवक शिवणी मध्य प्रदेशचे असले तरी ते मागील एक वर्षा पासून गोंदिया येथे कारंजा येथे राहत असून वॉल कंपाऊंड साठी लागणारे पोल तयार करण्याचे काम करत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *