ईव्हीएम मशीनच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा ने केले धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ईव्हीएम मशीन द्वारा निवडणूक म्हणजेच लोकतंत्र ची हत्या करण्यात येत असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चा ने केला आहे. ईव्हीएम मशीन द्वारे निवडणुकीत मशीन सेट केली जाते आणि मोठा घोटाळा करून निवडणूक जिंकली जातात. असे विविध आरोप करित ईव्हीएम मशीनच्या विरोधात आज बुधवारी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. व गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे मार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले. गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा द्वारे ईव्हीएम मशीन च्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीन द्वारे लोकतंत्रची हत्या केली जात आहे, त्याच प्रमाणे निवडणुकीमध्ये सुद्धा मोठा घोटाळा करून निवडणूक जिंकली जात आहे. असे आरोप करत या विरोधात देशात ६५० जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येत आहे. आणि येत्या ३१ जानेवारी ला दिल्ली चुनाव आयोगा च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असून जवळ पास १० लाख लोक या मोर्चात शामिल होणार आहेत. भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हा समन्वयक यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की आज देशात व राज्यात ईव्हिएम द्वारे लोकतंत्र ची हत्या केली जात आहे.

काँग्रेस पक्षाने जेव्हा २००४ आणि २००९ मध्ये निवडणूक जिंकली तेव्हा याच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर ईव्हिएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडणूक जिंकल्याचा आरोप केला होता. आज काँग्रेस पक्ष या मुद्द्याला घेऊन गप्प आहे. यात या दोन्ही पक्षांचे साटेलोटे असल्याचे दिसून येते, ईव्हिएम मशीन मुळेच देशात देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढत आहे, घोटाळे होत आहेत, शेतकºयांच्या समस्या आहेत, बेरोजगारांच्या समस्या आहेत, पेन्शन ची समस्या आहे या सर्व समस्यांची मूळ जड ही ईव्हिएम मशीनच आहे कारण सरकार ना वाटते की आम्हाला ईव्हिएम मशीन मध्ये घोटाळा करता येते तर मग जनतेच्या मतांची गरजच नाही, त्यामुळेच राज्यातील व देशातील या मोठ्या समस्यांचा समाधान ही सरकारे करीत नाही असा आरोप भारत मुक्ती मोर्चा चे समन्वयक संदीप मानकर यांनी केला आहे. आजच्या आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *