शाळेला ई लर्निंग मॅपसुद्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. अडबाले

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तुम्हाला समोर होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमाची ओढ लागली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम तुमचा सादरीकरण करायचंय. तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे याची मला जाणीव आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासारखाच मी एक सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे. विद्यार्थ्यांना काम करण्याचे तुमच्या शाळेमध्ये तसे आमचे शिक्षक मंडळी शिकवतात. तेच काम मी ३१ वर्ष केलेला आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता आम्हाला कळतात. विद्यार्थी किती घंटे बसू शकतात किती तास ऐकू शकतात हे सगळे मानसशास्त्र आम्हाला अवगत आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण फार चांगले विद्यार्थी आहात. या शाळेमध्ये प्रवेश केल्यास केलेले प्रवेश केल्यानंतरच आम्हाला लक्षात येते आहे. या प्रवेश केल्यानंतर रांगोळी सुद्धा आपण टाकलेली होती. म्हणजे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने सुद्धा चांगले प्रयत्न केले जातात. हे प्रथम दर्शनी मला या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे. तुम्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या शाळेमध्ये अ‍ॅक्टिव्हिटीज क्रीडा अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून जिल्हा स्तरावरती राज्यस्तरावरती सुद्धा आपला विद्यार्थ्यांमधून निवड झालेली आहे. त्याबद्दल या शाळेच्या जे शिक्षक आहे. प्राचार्य तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि आपल्यावरती आधारित परिश्रम घेतात. अशा या शाळेतील शिक्षकांचे सुद्धा ही मन:पूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो असे मार्गदर्शन करताना आमदार सुधाकर अडबाले यांनी म्हटले.

श्री सुदामा शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ (कला, विज्ञान) महाविद्यालय मोहाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार दि.२८, २९ व ३० डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार दि. २८ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुधाकर अडबाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी पुढे बोलताना अडबाले म्हणाले, आज परिस्थिती बदललेली आहे. या खेळांकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. हे करू नको अशा प्रकारची पालकांची सुद्धा मानसिकता तयार झालेली आहे. आपण बघतो सकाळी सकाळी बघितले तर असे पाहून आॅटोपर्यंत पोहोचून देतात ते आपण आपल्या पाल्यांना कुठेतरी आळशी बनवत आहोत असा आपल्याला दिसून येते. आमच्या जमान्यामध्ये ती पद्धत नव्हती. आमच्या जबाबदारामध्ये आमचे काम सगळे आम्हाला कराव लागत होते. म्हणून आम्ही घडलो या स्टेजपर्यंत आलेला विद्यार्थी आहे. अनेक विद्यार्थी आम्हाला शिक्षण देताना मारायचे. मी तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी तुमच्यामध्ये दुरुस्ती व्हावी शिस्त निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थी शिक्षा करत असतात. सौम्य स्वरूपाच्या शिक्षण पद्धती होत असतात. त्यांचा वाईट वाटून घेण्याची गरज नाही. परंतु आज जमाना बदललेला आहे. परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या असेच पाऊल आपण या शाळेचे विद्यार्थी चांगले आहात. जीवनामध्ये अपयशानंतर यष्टीची ट्रेन असेल याचा विचार करून जीवनामध्ये बिनधास्त जगण्यासाठी जगावे ही विद्यार्थ्यांकडून मला अपेक्षा आहे.

आजच्या शेवटी तुमच्या शालेय स्नेह वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घघाटन झाले असे जाहीर करित असल्याचे प्रतिपादन नागपूर विभागाचे शिक्षक आमदार अभिजित अडबाले यांनी उदघाटनप्रसंगी व्यक्त केले. प्रमुख अतिथी संस्थापक नारायणराव तितीरमारे, प्रमोद तितीरमारे, अविनाश चौधरी, देवेंद्र ईलमे, एकनाथ फेंडर, छाया डेकाटे, सचिन गायधने, आशिष पातरे, नरेश ईश्वरकर, दिनेश निमकर, दैनिक भंडारापत्रिकाचे यशवंत थोटे, सिराज शेख, नरेंद्र निमकर यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनी, हस्तकला प्रदर्शनी बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंच कैलास मते मलिदा, निशा आसाराम लांजेवार डोंगरगाव, लक्ष्मी लूटे टांगा, गुलाब सव्वालाखे मांडेसर, मनोहर राखडे दहेगाव, संजय सेलोकर चिचखेडा, हस्तकला पुंडे नवेगाव, रत्नमाला बडवाईक खरबी यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, सरस्वती मातेच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी राजेश धुर्वे, सुधाकर देशमुख, रामचंद्र धुमनकडे, रमेश गाढवे, मदन अग्रवाल, अशोक कुकडे विनायकराव वाघाये यांचासुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्वागतगीत इयत्ता ९ वी मधील संचिता रामप्रसाद मते, ट्विंकल सुनील भेंडे, दीपिका शरद नंदरधने, तुळशीराम सार्वे, सुप्रिया धनराज गराडे, नयना विश्वनाथ मेहर, मयविस विनोद कनोजे यांनी प्रस्तुत केले. नारायणराव तितीरमारे यांच्या पुढाकायार्ने विनाअनुदानित तत्वावर सुरू करण्यात आली.

प्रास्ताविक प्राचार्य किरण देशमुख यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलन उद्घघाटनप्रसंगी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आमदार राजु माणिकराव कारेमोरे हे उपस्थित झाले. महाविद्यालयातर्फे आमदार राजु कारेमोरे यांचे शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन असते. “उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,नजरेत सदा नवी दिशा असावी,घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी” आपल्या जीवनात परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करावे असे आवाहन आमदार राजु माणिकराव कारेमोरे यांनी स्नेहसंमेलनप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना केले. विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये सहभागी म्हणुन स्नेहसंमेलनाचा बसुन आनंद घेतला. याप्रसंगी आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी इयत्ता १२ वी सायन्सच्या विद्याथीर्नीच्या नृत्यवर रोख पाच हजार रुपये दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा खंडाईत यांनी केले तर उपस्थिततांचे आभार हेमंत लोंदासे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *