विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यासिका वर्गाचा लाभ घ्यावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जिल्ह्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांकरिता मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका वर्ग चे आयोजन करण्यात आले आहे. बहुसंख्येंत विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी केले आहे. अमरावती येथील प्रसिद्ध प्रा, गजानन कोरे यांच्या मार्ग दर्शना मध्ये साकोली येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२२ ला सकाळी १० वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्याशिका वर्ग (मोफत) याची सुरुवात झाडे कुनबीसमाज, भवन बस स्टॉप जवळ साकोली या ठिकाणीं मा. नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका वर्ग व मार्गदर्शन साठी स्वत: नोंदणी करून सुशिक्षित बेरोजगारांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठीची संधी मा नाना पटोले यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व स्पर्धा परीक्षा (विद्यार्थ्यांनी) विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. याकरिता नानाभाऊ पटोले जनसंपर्क कार्यालय प्रमुख उमेश भेंडारकर व महेश शिवणकर यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आयोजकांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *