पोहायला गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:- तालुक्यातील सिपेवाडा येथील तलावात मित्रांसह पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुशील वासुदेव हटनागर वय ३८ रा. प्रभाग क्र. ११ लाखनी असे मृतकाचे नाव आहे. मृतक सुशील हटनागर हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असून तो मागील काही दिवसांपासून सिपेवाडा येथील तलावात पोहण्यासाठी जात होता. आजही मित्रांसह पोहायला गेला होता.तलावात पोहत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना व कुटुंबियांना देण्यात आली. घटना स्थळी कुटुंबीय व पोलीस पोहचले पोलिसांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढले. व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून घटनेचा अधिक तपास पोलीस नायक श्रीकांत वाघाये करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *