केंद्रात तानाशाह, राज्यात येड्यांची सरकार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली चे आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी तालुक्यात ३ आॅगस्ट ते १२ आॅगस्ट दरम्यान ६ जि.प.क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लाखनी तालुक्यातील मुरमाडी/ तूप जि.प.क्षेत्रातील भूगाव/पंढरपूर येथून जनसंवाद पदयात्रेचा प्रारंभ तर मंगळवारी (ता.१२) ला कच्छी मेमन हॉल लाखनी येथे समारोप करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी केंद्रात तानाशाह, राज्यात येड्यांची सरकार असून ई म्हणजे एकनाथ डी म्हणजे देवेंद्र आणि ए अजित पवार असा टोला त्यांनी यावेळी लगावत या येड्यांच्या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन पटोले यांनी केले याप्रसंगी जिल्हा कांग्रेस पदाधिकाºयासह तालुक्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकारला येणाºया २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत करून देशात आणि राज्यात काँग्रेस व मित्र पक्षाचे सरकार आणण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा असल्याचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी जनसंवाद पदयात्रेच्या समारोपीय मार्गदर्शनात सांगितले.

महागाई, बेरोजगारी, खासगीकरण आणि देशात असणारे असंख्य उद्योग, रेल्वे, भेल, बँक, विमान, वाहतूक आणि शेतकºयांचे अनेक प्रश्न यावर भाजपाचा खरपूस समाचार घेतला. लाखनी येथील जनसंवाद पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, प्रदेश कमिटी सदस्य आकाश कोरे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, तालुका कांग्रेस अध्यक्ष योगराज झलके, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, जि.प.सदस्या मनीषा निंबार्ते, सरिता कापसे, जिल्हा उपाध्यक्ष शफी लध्दानी, डॉक्टर आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, साकोली विधानसभा क्षेत्र प्रमुख धनंजय तिरपुडे, पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे, प.स. सदस्या योगिता झलके, मनीषा हलमारे, अस्विनी मोहतुरे, प.स. सदस्य सुनील बांते, विकास वासनिक, मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत, युवक तालुकाध्यक्ष यशवंत खेडीकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष पुष्पा डुंभरे, सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचेसह काँग्रेस चे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्र प्रमुख, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *