गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी व गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त हक्क कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावचे भूमी अधिग्रहण कायदा २०१३ नुसार पुनर्वसन, रोजगार, नोकरी, बॅक वॉटरमुळे होणाºया नुकसानीची भरपाई, घरे व शेती हक्कासाठी १५ फेब्रुवारी २०२४ रोज गुरुवारला सकाळी ११:३० वाजता दसरा मैदान शास्त्री चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारावर संविधान तज्ञ अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त अधिकार मोर्च्यांचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सध्या २४५.५ मीटर पातळीवर धरणाच्या पाण्याने वेढलेल्या गावांचे पुनर्वसन, जल संपादन व पुनर्वसन कायदा २०१३ नुसारच करण्यात यावे. तथा आजपर्यत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.

प्रकल्पग्रस्तांना मागेल त्याला पयार्यी शेतजमीन देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांना देवू केलेली अनुदेय रक्कम वाढीसह व वाढीव कुटुंबासह प्रकल्पग्रस्तांना त्वरित देण्यात यावी. ज्या जुन्या प्रकरणांचा निवाडा १ जानेवारी २०१४ नंतर झालेला आहे. त्यांना नवीन कायद्याप्रमाणे डेट आॅफ नोटीफिकेशनची तारीख १ जानेवारी २०१४ पकडून मोबदला व पुनर्वसन हक्क देण्यात यावे. या मागण्यांकरिता बहुजन रिपब्लिकन सोशलीस्ट पार्टी व गोरेखुर्स प्रकल्पग्रस्त हक्क कृती समितीच्यावतीने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त अधिकार मोर्चाचे आयोजन केले आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी या मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे संयोजक शिवशंकर माटे, धनंजय मूलकलवार, सुरेश मोटघरे, मनीषा भांडारकर, भाऊ कातोरे, कन्हैय्या श्यामकुवर, शिलवंत मेश्राम, टेरीराम घोळके, गुलाब घोडसे, स्नेहा साखरवाडे, वंदना दंडारे, युवराज राखडे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *