‘त्या’ बोगस डॉक्टरची निष्पक्ष चौकशी करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील तई येथील बोगस डॉक्टर हरिभाऊ येवले यांच्या तक्रारी संबंधाने चौकशी करताना तालुका वैद्यकीय अधिकारी कैकाळे यांचेकडून अर्थव्यवहार करून प्रकरण दडपण्याचा निष्फळ प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत त्या बोगस डॉक्टरची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तक्रारदार सृष्टी येवले यांनी गुरुवार दि.२१ मार्च रोजी आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे. गत अनेक वर्षांपासून लाखांदूर तालुक्यातील तई येथील हरिभाऊ येवले व कुटुंबीय यांचेकडे डॉक्टरकीची कसलीही डिग्री नसताना कुटुंबातील हरिभाऊ येवले यांचेसह पत्नी, मुलगा व सून यांचेकडून स्थानिक तथा परिसरातील रुग्णांवर उपचार केला जात असून त्यांना आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथिक औषधी देवून रुग्णांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे, येथीलच सृष्टी येवले हिने गतवर्षी २० आॅक्टोंबर २०२४ रोजी जिल्हा वैद्यकीय अधिकाºयांना या विषयी तक्रार करीत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, जिल्हा वैद्यकीय अधिकाºयांनी सदर प्रकरणी चौकशीचे फर्मान काढले. ज्याची चौकशी लाखांदूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कैकाळे यांनी केली.

या चौकशीनुसार, सदर डॉक्टरांना केवळ आॅर्वेदिक औषधीसाठा मिळाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कैकाळे यांचेकडून मिळाली होती. मात्र, ही चौकशी बनावट असल्याचा आरोप करीत चौकशी करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कैकाळे यांचेकडून अर्थकारण करून हा प्रकरण दडपण्याचा निष्फळ प्रयत्न केला जात असल्याचा स्पष्ट आरोप तक्रारकर्त्या सृष्टी येवले यांनी केला आहे. तसेच, तक्रारकर्त्यांना चौकशी संबंधाने सूचना न देता चौकशी कशी केली? चौकशीदरम्यान आयुर्वेदिक औषधांच्या साठ्यासह शासकीय औषधी व सलाईन सुद्धा त्या ठिकाणी मिळाल्या असल्या तरी मात्र डॉ.कैकाळे यांनी प्रलोभनातून आयुर्वेदिक औषधी मिळाल्याचे निष्पन्न करून प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप तक्रारकर्त्या सृष्टी येवले यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. त्यामुळे, या सबंध प्रकारची निष्पक्ष चौकशी करावी. तसेच बनावट चौकशी अहवाल सादर करणारे डॉ. कैकाळे यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी सृष्टी येवले यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.