बागेश्वर महाराजांचे बाबा जुमदेवजींबाबत आक्षेपार्ह विधान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर बाबा यांनी मोहाडी येथे भागवत सप्ताहकार्यक्रमात मानवधर्माची शिकवण देणाºया बाबा जुमदेवजी महाराज आणि त्यांच्या परमात्मा एक सेवकांबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत असुन संपुर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण दिसुन येत आहे. बागेश्वर बाबा यांनी बाबा जुमदेवजी व त्यांच्या सेवकांची जाहिर माफी मागावी अशी मागणी करीत बाबा बागेश्वर यांच्याविरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.यावेळी परमात्मा एक सेवकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. यामुळे भावना दुखावलेल्या परमात्मा एक सेवकांनी आणि बाबा जुमदेव महाराज यांना मानणाºया कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काल रात्रीतक्रार दाखल केल्या. यात आता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उडी घेतली असून शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. दरम्यान बाबा बागेश्वर धाम यांनी आजच्या त्यांच्या प्रवचनातुन बाबा जुमदेव महाराज व त्यांच्या सेवकांची माफी मागीतल्याची माहिती आहे.

वादग्रस्त विधानानंतर तणाव

बागेश्वर बाबांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भंडारा, गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भात लाखोंच्या संख्येत असलेल्या बाबा जुमदेवजी यांना मानणाºया परमात्मा एक सेवकांमधुन रोष व्यक्त केला जात आहे. सोबतच बाबा बागेश्वरांना अटक करण्यात यावी या मागणी करिता मोहाडी पोलीस स्टेशन येथे परमात्मा एक सेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून बाबा बागेश्वरांना तात्काळ अटक करा, अशी मागणी या समुदायामार्फत केली जात आहे.

बागेश्वर बाबा यांचे नेमके विधान काय ?

भंडारा जिल्ह्यात एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचे नाही, जय गुरुदेव बोलाष्ठ.जो हनुमान संपूर्ण जीवनभर राम राम बोलला, त्यांचे उपासक राम राम नाही बोलणार. हद्द झाली यार…रसगुल्ला खात आहेत.. मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाºया लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहे, तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *