सिहोराच्या शादाबने चेन्नईत पटकावला सुवर्ण पदक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : तामिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रिडा विद्यापीठाच्या यजमान पदाखाली चैन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याºया शादाब पठाणने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तो आर्टस् कॉलेज सिहोरा येथील बीए अंतिम वर्षाचा विद्यार्थी आह१३ ते १६ मार्च दरम्यान ही स्पर्धा झाली. यात शादाबने ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवित प्रथम स्थानासह सुवर्ण पदक पटकावला. त्याने १३ मिनीट ५८.४८ सेंकद इतक्या वेळेत स्पर्धा पुर्ण केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात शादाब हा अखिल भारतीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला खेळाडू आहे. १३ मार्च रोजी १० हजार मिटर शर्यतीत २९ मिनिटे २८.६५ सेंकद ऐवढी वेळ नोंदवित चौथे स्थान प्राप्त केले. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र.कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यापिठाचे शारीरिक शिक्षण व किडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी, स्व. तुळसाबाई शिक्षण संस्थेचे सचिव कविता गभणे, अध्यक्ष दिलीप सोमनाथे, प्राचार्य डॉ. सचिन चापले, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयकुमार क्षिरसागर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व क्रिडाप्रेमींनी शादाबचे कौतुक व अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *