गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शेतावर गेलेला इसम उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने शोधण्यासाठी गेलेल्या नागरिकांना शेतकरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली. ही घटना १७ मार्च रोजी सायंकाळी ६ .३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव को शेत शिवारात उघडकीस आली. सुधाकर लक्ष्मण मेश्राम (६२) रा पिंपळगाव को असे घटनेतील मृतक शेतकºयाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास घटनेतील मृतक सुधाकर मालकी शेतातगेला होता. नेहमी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरी परतणारा सुधाकर ६ वाजून देखील घरी न परतल्याने चिंताग्रस्त कुटुंबीयांनी सुधाकरचा शोध घेणे सुरू केला. सुधाकरच्या शोधात शेतशिवारात गेलेल्या इसमांना सुधाकर शेतातील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यांनी या घटनेची माहिती सुधाकरच्या कुटुंबीयांसह लाखांदूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सुधाकरने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र अद्याप कळु शकले नाही. लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *