दत्त नामाच्या गजरात दुमदुमली अवघी लाखनी नगरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक येथे श्री गणेश दत्तगुरु मंदिर येथे परमपूज्य विष्णुदास स्वामी आध्यात्मिक केंद्र लाखनीच्या वतीने धर्मभाष कर सद्गुरुदास महाराज यांच्या प्रेरणेने दत्त मंदिर लाखनी येथे नवरात्र उत्सव आणि दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन १९ ते २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. मंदिरात श्री गुरुचरित्र साप्ताहिक वाचन ह. भ. प. प्रा डॉ. स्मिताताई आजगावकर पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमाच्या लाभ उपासकांनी घेतला.

दिव्यांग बालकांच्या गंध फुलांच्या असा संगीतमय कलाविष्काराच्या कार्यक्रम याप्रसंगी नागरिकांनी आस्वाद घेतला. श्रीमद्भगवद्गीता पठण, हरिपाठ, भजन, लाखनी नगर पालखी प्रदक्षिणा सुखताभिषेक, दत्त जन्म सोहळा आणि दत्त जन्म कीर्तन अशा एकूण भरगच्च कार्यक्रमांनी दत्त जयंती लाखनी येथे साजरी केली. आज दत्त जयंती निमित्त लाखनी नगर प्रदक्षिणा करण्यात आली त्यावेळी लाखनीतील रहिवाशांनी आपल्या घरासमोर दत्त जन्म पालखी निमित्य सडा रांगोळी फुलांनी लाखनी नगरी सजवलेली होती. मंगलमय आणि आनंददायक वातावरण लाखनी मध्ये अनुभवास मिळाले. अशा मंगलमय कार्यक्रमाची सांगता उद्या २७ डिसेंबर गोपाल काला आणि महाप्रसाधाने होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *