टिप्परच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : लगतच्या खापा चौफुलीवर १० चाकी टिप्पर वळण घेत असताना त्याच दिशेने येणाºया दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी टीप्परवर धडकून दुचाकी चालकासह दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दी १३ मार्च रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. रोहित नागपुरे वय २६ वर्ष व शुभम पशिने वय २५ वर्ष दोघेही रा.मांडेसर ता. तुमसर जि. भंडारा असे जखमींची नावे आहेत. तर प्रमोद धनराज पटले वय २५ वर्ष रा. मेहंदीपुर ता. तिरोडा जी गोंदिया असे टीप्पर चालकाचे नाव आहे. अदाणी पॉवर प्लांट तीरोडा येथील एकदहा चाकी टीप्पर क्र एम एच३६ एफ ३०७० मध्ये भरून ती एश तालुक्यातील येरली येथे खाली करून परती च्या मार्गावर असताना खापा येथील चौफुलीवर तीरोडा मार्गाकडे वळण घेत असताना तुमसर वरून त्याच दिशेने येणारी दुचाकी बजाज पल्सर क्रं एम एच ३६ ए ए २९०८ वरचा दुचाकीस्वार हा टीप्पर ला ओव्हर टेक करत होता.

दरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी टिप्परवर धडकली त्यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. खापा चौफुली हे अपघाताला निमंत्रण देणारे स्थळ ठरित आहे. चौकात असलेले अतिक्रमण व रस्त्यावर उभी राहणारी वाहणे या गोष्टी अपघातास कारणीभूत ठरत आहेत.मागील काही दिवसांपासूनखापा चौकात अनेक अपघात होते आहे. याकडे पोलीस प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार होणाºया या अपघातास प्रशासन कारणीभुत असल्याचा आरोप े नागरिकाकडुन होत आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *