नूह हिंसाचाराचा विहिंप, बजरंग दल तर्फे निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हरियाणातील नूह येथे आयोजित ब्रजमंडल यात्रेत सहभागी हिंदू श्रध्दाळूंवर करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भंडारा जिल्हा तर्फे आज निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे दरवर्षी हरियाणा राज्यातील नूह येथे प्राचीन शिवमंदिरात ब्रजमंडल यात्रेचे आयोजन करण्यात येते. सदर यात्रेत समस्त हिंदू समाजातील महिलांसह लहान बालकांचाही सहभाग होता.

यावेळी काही जिहादी विकृत मानसिकतेच्या लोकांकडून सुनियोजित कट करून यात्रेकरूंवर हल्ला करण्यात आला. यात जोरदार दगडफेक, जाळपोळ व गोळीबार सुध्दा करून मोठे अग्नीतांडव करण्यात आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर काही कार्यकर्ते जखमी झाले. या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांतर्फे आज ३ आॅगस्ट रोजी भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रकारच्या हिंदू विरोधी घटना भविष्यात होऊ नये व जिहादी मानसिकतेच्या लोकांमुळे समाजातील एकता समाप्त होऊ नये याकरिता प्रशासनातर्फे कारवाई करण्याचा आग्रह निवेदनाद्वारे करण्यात आला. लवकरात लवकर योग्य कार्यवाही न झाल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आपल्या पध्दतीने कार्यवाही करेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष करमसीभाई पटेल, जिल्हा सहमंत्री प्रदीप ढबाले, बजरंग दल जिल्हा संयोजक विकास पडोळे, जिल्हा कार्यकारणीचे प्रकाश पांडे, विभाग संयोजक दीपक कुंभरे, समरसता प्रमूख गजानन मेहर, राजकुमार भोजवानी, निशांत पडोळे आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *