जि. प. सदस्या तुमेश्वरी बघेले अपघातात जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या तिरोडा कडून वडेगाव कडे जात असताना समोरून एका बोलोरो पिकप गाडीने धडक दिल्याने जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज दिनांक ३ आॅगस्ट रोजी दुपारी १२.४५ चे दरम्यान वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या तुमेश्वरी बघेले आपले स्कुटी क्रमांक एम एच ३५ एओ ४००८ ने तिरोडा येथून वडेगाव कडे जात असताना समोरून येत असलेल्या बोलेरो मालवाहक क्रमांक एम. एच .३७-ख-१२४३ चे समोरील स्पिगपट्टे तुटल्याने बोलेरो अनियंत्रित होऊन उजव्या बाजूचे डीवाईडरवर चढल्याने समोरून येत असलेल्या जि.प.सदस्या तुमेश्र्वरी यांचे स्कुटीला धडक दिल्याने त्या खाली पडुन त्यांचे कंबरेला व डोक्याला मार लागल्याने जवळचे लोकांनी त्वरित त्यांना तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले असून बातमी लिहीपर्यत तिरोडा पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.