शेतीच्या वादातुन दोन कुटूंबात हाणामारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सामुहीक शेतीतील विजबिल भरण्याचा वादात दोन कुटुबियांमध्ये हाणामारी होऊन काकू आणि पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील वाकल येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पालांदूर पोलिस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतण्या विलास पुनाजी नंदरधने (४०) आणि काकू देवांगना रामकृष्ण नंदरधने (४५) रा. वाकल ता. लाखनी अशी जखमींची नावे आहेत. विलास आणि देवांगना यांची तीन एकर सामूहिक शेती आहे. त्यात मोटरपंपद्वारे सिंचन केले जाते. त्यांचे हिस्स्सेवाटणी होऊन अर्धी अर्धी शेती दोघांना देण्यात आली. मोटारपंप देवांगना यांच्या वाट्याला आले. मात्र जुने वीजबिल भरण्याचा वाद असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचे. रविवारी सकाळी थकीत बिलावरून वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. त्यात विलासच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तर देवागंना यांनाही काठीचा मार लागला. याप्रकरणी पालांदूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून विलास नंदरधने यांच्यासह देवांगना नंदरधने, लालचंद नंदरधने, लोकचंद नंदरधने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीट अंमलदार ओमप्रकाश केवट, पोलिस शिपाई नावेद, भालचंद्र अडेल करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *