धाना ला सरसकट बोनस जाहीर करा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आजपासून महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु झाले असुन विदर्भातील शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून धान उत्पादक शेतकºयांना सरसकट बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे. विदभार्तील धान उत्पादक जिल्हे म्हणून भंडारा, गोंदिया, नागपुर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात असुन या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेऊन देशाला पोसण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. मागील अतिवृष्टी मुळे अनेक शेतकरी हतबल झाले असतांना राज्यशासनाने काही प्रमाणात अल्पशी मदत जाहीर केल्याने शेतकºयांचा अपेक्षा भंग झाली. केंद्र सरकारच्या किमान आधारभुत हमीभाव धान खरेदी योजनेनुसार भंडारा जिल्ह्यात अनेक धान खरेदी केंद्रास जिल्हाधिकारी कार्यालया कडून मंजुरी देण्यात आली असतांना शेतकºयांनी मेहनतीने इ पीक नोंदणी करून परत धान विक्रीकरिता राज्य सरकार च्या धान खरेदी पोर्टलवर नोंदणी केली.परंतु शेतकºयांचे धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी जात असतांनाच मात्र राज्य सरकार च्या पत्रानुसार जिल्हाधिकारी भंडारा यांनी १०५ खरेदी केंद्राची मंजुरी रद्द केल्याने शेवटी शेतकºयांचा भ्रमनिरास झाला. परिणामी शेतकºयांना परत खुल्या खाजगी व्यापाºयांना कवडीमोल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. या खरेदी केंद्र बंद करण्याच्या तुघलकी निर्णयामुळे अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार असल्याने ज्या शेतकºयांनी इ पीक नोंदणी करून विक्रीसाठी नोंदणी केली पण खरेदी केंद्रावर धान्य विकु शकत नाही ,व ज्यांनी खरेदी केंद्रावर धान्याची विक्री केली आहे किंवा करत आहेत अशा सर्व शेतकºयांना मदत म्हणून राज्य सरकारने सरसकट बोनस जाहीर करावा अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.