कामगाराची आत्महत्या, कुटूंबियांचा कंपनीला घेराव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील मारेगाव येथील एमएमपी इंडस्ट्रीज (भूत) कंपनीतील एका कंत्राटी कामगाराने इतर कामगारांच्या त्रासापोटी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी आज मृतदेहासह वंष्ठपनीसमोर आंदोलन केले. तब्बल चार ते पाच तास मृतदेह आंदोलनस्थळी ठेवण्यात आले. यावेळी कंपनी प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मोरेश्वर भोयर वय २० वर्षे रा.गोपेवाडा/शहापुर असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा मारेगाव येथील एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत ठेकेदारा पध्दतीत मागील दोन वर्षापासुन कामगार म्हणुन काम करीत होता. दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी मृतक मोरेश्वर भोयर हा नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेला असता गेटवर त्याची ऐंट्री घेवुन त्याला कंपनीत प्रवेश देण्यात आला.मात्र कंत्राटदाराने मोरेश्वर भोयर याला दारू पिऊन असल्याचे कारण सांगत कंपनीबाहेर काढले.त्यावेळी कंपनीतील इतर कंत्राटी कामगारांसोबत मोरेश्वर याचे कडाक्याचे भांडण होवुन धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.

त्यामुळे कंपनीतील कामगारांनी मृतक मोरेश्वर भोयर याच्याविरोधात पोलीसात तकार दिली.आता आपल्यावर पोलीस कारवाई करणार व आपल्याला अटक होईल याविचाराने त्रस्त होवुन दि.२७ सप्टेंबर रोजी मोरेश्वर याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी मृतक मोरेश्वर भोयर यांच्या कुटूंबीयांनी गावकºयांसह कंपनीसमोर मृतदेह ठेवीत कंपनीतील कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करीत मृतदेह वंष्ठपनी गेटसमोर ठेवला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु,भंडारा ठाणेदार सुभाष बारसे,वंष्ठपनी कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे, उपाध्यक्ष प्रशांत लांजेवार, तुमसर पं.स.सभापती नंदु रहांगडाले, भंडारा पंचायत समितीचे माजी सभापती नरेद्र झंझाड यांच्यासह शेकडो नागरीक उपस्थित होते. यावेळी कांनी प्रशासन व आंदोलकांमध्ये चर्चा होवुन मृतक मोरेश्वर याच्या भावाला तात्काळ कंपनीत कंत्राटी कामगार म्हणुन नियुक्ती देत दोन वर्षानंतर त्याला कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले. तर कंपनीतील कामगार कंत्राटदार श्री.उईके यांनी मृतकाच्या अंत्यविधीकरीता तात्काळ २५ हजार रूपयाची मदत देत कामगार विमा योजनेअंतर्गत मृतकाच्या कुटूंबियांना लाभ देण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *