बीआरएस महाराष्ट्रात देणार ‘अबकी बार किसान सरकार’चा नारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी मागील दहा वर्षात तेलंगणा राज्याचा जो सर्वांगिण विकास साधला त्यामुळे तेलंगना एक विकासाचे मॉडल म्हणुन पुढे आले आहे. हेच विकासाचे धोरण डोळयापुढे ठेवुन आता बीआरएस पक्षाने महाराष्टात देखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी बी.आर.एस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व राज्य समन्वयक शेतकरी नेते दशरथ काका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राष्ट्र किसान समितीच्या माध्यमातून ‘अबकी बार किसान सरकार’ चा संपुर्ण घुमणार असुन हा नारा बुलंद करण्याकरीता बीआरएस तर्पेष्ठ महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघामध्ये २८८ ठिकाणी ‘किसान रथ’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समितीचे चरण वाघमारे यांनी दिली आहे. यासंदर्भात बी आर एस च्या सर्व संबंधित पदाधिकारी वकार्यकर्ते यांच्यासाठी ८ व ९ मे रोजी हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबीर आयोजत केले आहे.

१० मे पासून भारत राष्ट्र किसान समिती किसान रॅली च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात व प्रत्येक गावात घरा घरात बी आर एस पक्षाचे ध्येय धोरण, शेतकºयांसाठीच्या योजना आणि इतरही कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. १० मे पासून जवळच्या जिल्ह्यातील काही वाहने शिवनेरीवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन तर काही विदभार्तील नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ‘अबकी बार किसान सरकार नारा’ किसान रॅली ला सुरूवात करण्यात येईल. तर इतर जिल्ह्यातील व तालुक्यातील वाहने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करतील तरी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातील शेतकºयांनी या किसान रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे चरण वाघमारे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *