७ ला रुग्णवाहिका चालक घेणार जलसमाधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : चालकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही वेतन थकीत असल्याने त्यांनी वैनगंगेच्या स्मशानघाटावर ७ फेब्रुवारीला जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आपले निवेदन जिल्हा आरोग्य अधिकाºयांना सोपविले आहे. राज्यस्तरावरून नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून या रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, कंत्राटदाराकडून नेहमी फसवणूक व पिळवणुकीचा जाच सुरू आहे. कंत्राटदाराची तक्रार केल्याने गेल्या ३ महिन्यांपूर्वी सरकारने हे कंत्राट रद्द केले. तथापि रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून आमचा वापर करून घेतला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून त्याबदल्यात केलेल्या कामाचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

५ फेब्रुवारीपर्यंत तीन महिन्यांचे थकीत वेतन त्वरेने द्यावे. जिल्हास्तरावरून १९ हजार रुपए मासिक वेतनासह नियुक्तीचे आदेश देण्यात यावे. अन्यथा ७ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता भंडारा शहरातील स्मशानभूमी जवळील वैनगंगेत उड्या टाकून जलसमाधी घेऊ असा इशारा नवजीवन रूग्णवाहिका वाहनचालक वेलफेअर असो.चे अध्यक्ष जितेंद्र डोंगरे, राजकुमार ढेफले, महेंद्र मेश्राम, अविलास फुले, नितीन कावळे, योगेश कारेमोर, विलास गराट, क्रिष्ण तलमले, राजु डोंगरवार, शशीकांत गणवीर, शरीफ शेख, महेश लांजेवार, हिवराज सोनवाने, अंताराम राहांगडाले, नितीन काळे, पंढरी कोरे, गौरीशंकर गिरेपुंजे, धनराज मिसार यांनी दिला आहे. सदर निवेदनाची एक प्रत खासदार सुनिल मेढें, जिल्हाधिकारी भंडारा, पोलीस अधिक्षक भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा, आरोग्य सभापती रमेश पारधी, भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *