धान पीकाना मिळणार पच पकल्पाच पाणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मौदा तालुक्यातील निमखेडा विरशि फाटापरिसरातील कॅनल फुटल्याने कॅनलचे दार बंद करण्यात आले परिणामी खात, भंडारा व मोहाडी तालुक्यातील हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याअभावी शेतातील धानपिक करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्ग चिंतेच्या खाईत लोटला असतांना कॉंग्रेसच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांची अडचण जाणुन घेत पेंच प्रकल्प विभागाच्या अधिकाºयाची भेट घेवुन चर्चा करून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. उद्या ११ आॅक्टों. पर्यत भंडारा व मोहाडी तालुक्यातील शेतीला सिंचनासाठी कॅनलचे पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आंनद व्यक्त केल्या जात आहे. मौदा तालुक्यातील निमखेडा विरशी फाटा परिसरातील कॅनल फुटल्यामुळे पेंच प्रकल्प विभागातर्फे कॅनलचे दार बंद करण्यात आले होते.

दरम्यान फुटलेल्या कॅनलची दुरूस्ती होवुनसुध्दा पाणी सोडण्यात न आल्याने भंडारा व मोहाडी तालुक्यातील हजारो एकर शेतातील धानपीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी हाती आलेले धानपीक जाणार या चिंतेने शेतकरी वर्ग संकटात आला होता. शेतकºयांचे हे संकट लक्षात घेत भंडारा तालुका कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, बालु ठवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावें, दिपक बेदलकर यांनी पेंच प्रकल्पाचे अभियंता श्री. हटवार, उपविभागीय अभियंता श्री. ढेंगे, उपविभागीय अभियंता. श्री.नरड यांची भेट घेवुन पाण्याअभावी भंडारा व मोहाडी तालुक्यातील धानीपीके धोक्यात आली असल्याने तात्काळ कॅनलचे पाणी सोडण्याची विनंती केली त्यानुसार निमखेडा विरशी फाटा परिसरातील बंद असलेले कॅनलचे दार उघडण्यात आले असुन कॅनलमधुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उद्या दि. ११ आॅक्टोंबर पर्यंत भंडारा व मोहाडी तालुक्यातील शेतीला कॅनलद्वारे पेंच प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *