जागृत मोहाडीची माता चोंडेश्वरी देवी!

महाराष्ट्र राज्यातील पूर्व-पश्चिम रेल्वेमार्ग मुंबई- कलकत्ता या मार्गावर विदर्भातील उपराजधानी नागपूरजवळून ८० कि.मी.अंतरावर तर भंडारा जिल्हास्थानापासून २१ कि.मी. अंतरावर भंडारारोड रेल्वस्टेशनपासून ११ कि.मी.अंतरावर मोहाडी हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे़ भंडारा-तुमसर राज्यमार्गावरून सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मोहाडीला येण्याकरिता भरपूर एस.टी. बसेस चालतात. भंडारामार्ग आले तर श्री.संत जगनाडे चौकातून पश्चिम दिशेला सुप्रसिद्ध माता चोंडेश्वरी देवीचे जागृत मंदिर आहे़. मंदिरासमोरून श्री क्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर सुप्रसिद्ध जागृत माता चोंडेश्वरीदेवीचे मंदिर आहे़. मोहाडीवासीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले पुरातन मंदिर आहे़. अश्विन शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी विधीवत घटस्थापना करून धार्मिक मंगलमय वातावरणात नवरात्रोत्सव प्रारंभ होतो. नवरात्र महोत्सव अतिशय उत्साहात सुरू झाला असून सुप्रसिद्ध जागृत माता चोंडेश्वरीदेवीचे मंदिर पुरातनकालीन ब्रिटीशांच्या राजवटीतील आहे़. मोहाडीला अश्विन शारदीय नवरात्र महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील आणि मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता घटस्तंभ ठेवतात. अनेक वर्षापासून उपेक्षीत असलेल्या या अतिप्राचीन मंदिरच्या जिर्णोद्धार करण्यात आल्यानंतर मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येत असून मंदिर परिसराचा संपूर्ण विकास करीत आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात मोकळ्या जागेत शोभीवंत फुलझाडांची लागवड करण्यात आल्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे़. माता चोंडेश्वरीदेवी मंदिर कमेटीच्या कार्यामुळे प्रभावित होऊन अनेक दानशुर नागरिक मंदिराला आर्थिक मदत करीत आहेत.

‘नवरात्र महोत्सव’

भंडारापासून २१ कि.मी.व तुमसरपासून ११ कि.मी.अंतरावर मोहाडी हे गाव आहे़. भंडारामार्गे आले तर श्री संत जगनाडे चौकात उतरावे मोहाडी या गावाच्या पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर देवी मंदिर आहे़. मोहाडी व परिसरातील जनतेचे श्रद्धास्थान असलेले माँ चोंडेश्वरी देवीचे मंदिर अत्यंत जागृत अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्रात या परिस-रातील भाविक पायपीट करीत देवीच्या दर्शनासाठी येतात. आपल्या अस्तित्वाने मोहाडी नगरीला पुनीत करणाºया या माँ चोंडेश्वरीदेवीच्या नावावरुन मोहाडी हे नाव पडले असावे. गावाच्या पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर आपल्या गोड व रंगीबेरंगी पक्षी ह्रदयस्पर्शी स्वरांनी अरण्याचा सारा आसमंत भरून टाकणारे मंदिर आम्रपाली व विविध वृक्षांनी बहरलेले रम्यस्थळ आहे़. अश्विन शारदीय नवरात्रमध्ये सन १९९३ ला १, १९९४ ला ५, १९९५ ला ७, १९९६ ला १२, १९९७ ला २४, १९९८ ला ३५, १९९९ ला ५६, २००० ला १५०, २००१ ला १७३, २००२ ला २१२, २००३ ला २७८, २००४ ला ३८०, २००५ ला ४२४, २००६ ला ५२७, २००७ ला ६२१, २००८ ला ७२७, २००९ ला ७८८, २०१० ला ९३२, २०११ ला १०२७, २०१२ ला ११९९, २०१३ ला ११९७, २०१४ ला १२७४, २०१५ ला १३५१, २०१६ ला १४२८, २०१७ ला १३८२, २०१८ ला १४५७, २०१९ ला १५०६, २०२० ला १२४३, २०२१ ला १३२१, २०२२ ला १४४० सर्वसाधारण घटस्थापना करण्यात आले. मोठ्या श्रद्धेने भाविक येतात व घटस्तंभाचे दर्शन घेतात. मंदिर परिसरातआजही टेकडी या नावाने लोकप्रिय आहे़. माँ चोंडेश्वरीदेवी जमिनीतून प्रगट झाली आहे़.

‘सहाशे वषार्पूवीर्ची…!’

मोहाडी येथील जाणकार सांगतात की, आज ज्या ठिकाणी माँ चोंडेश्वरीदेवी मंदिर आहे़. त्या ठिकाणी फार मोठे घनदाट जंगल होते. वृक्षवेलींनी नटलेल्या टेकडीला वेढा घालत जाणारी श्रीक्षेत्र गायमुख नदीयामुळे जी जागा तपोवनासारखी शांत व निसर्गरम्य वाटायची़ या निसर्गरम्यस्थळी त्यावेळी संत नारायणस्वामी यांनी मुक्काम केला. गावकºयांकडून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. त्या काळात रस्ते नसल्यामुळे मोहाडी हे गाव अतिदुर्गम होते. ब्रिटीश-ांची राजवट होती. गावात सुखशांती नांदावी याकरिता त्यांनी या टेकडीवर महाचण्डी यज्ञाचे आयोजन केले. हवन करणे, महायज्ञ करणे, कुटुंबाची प्रथा होती.़ त्यांनी आपली इच्छा प्राप्तीसाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. श्री दत्तपाठ गुरूघटांची स्थापना करून त्यांनी पुजेला सुरूवात केली. महायज्ञाच्या आवर्तनासाठी तुप, दुध, बेल, फळ, फुल, धूप व पुजा साहित्य ठेवल्या गेले होते. महायज्ञाच्या आवर्तनासाठी दुरवरून आलेल्या ऋषीमुनींनी मंत्रोपचाराला सुरूवात केली. प्रारंभी महायज्ञाच्या आवर्तनासाठी ठेवलेले साहित्य संपले. त्यानंतर ऋषीमुनींनी बाजूला ठेवलेले ऋग्वेद, यजुर्वेद, अर्थवेद व सामवेदांचे एक एक पान सोडत असताना हवनकुंडात गर्जना करीत माँ चौण्डेश्वरीचे चेहरा बाहेर आला़ माँ चौण्डेश्वरी म्हणाली, आपने जो महाचन्डी महायज्ञ हवनकुंड में, सच्चे मन से मेरी साधना की और जो चार वेद छोडे उसकी शक्ती बनकर मै प्रगट हुई हूँ, आप मुंझे मॉ चौवदेश्वरी कहसकते है, जो भी भक्त मेरी सच्चे मन से साधना करेगा मै उसकी मनोकामना पुर्ण करूंगी, मेरा आशिर्वाद आदी अनादिकाल तक रहेगा व माँ अंतर्मुख झाली़ माँ चौवदेश्वरी कालांतराने माँ. चौंडेश्वरी या नावाने प्रचलित झाले आहे़. आजही मोहाडीची माँ चोंडेश्वरी देवी विदर्भात व भंडारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे़.

‘ऐतिहासिक पार्श्वभूमी’

अतिशय पुरातन असलेल्या या मॉ चोंडेश्वरी देवी मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्थापनेपासून अनेक वर्ष मॉ चोंडेश्वरीदेवीची मूर्ती उघड्यावर एका ओट्यावरच्या हवनकुंडात स्थापवलेली होती. श्री संत नारायण स्वामी त्यावेळी देखभाल करीत होते. काही वर्षानी नारायण स्वामीचे निधन झाले. त्यानंतर नारायण स्वामींच्या कुटूंबातील सदस्यगण देखभाल करीत होते. काही काळातच नारायण स्वामींच्या कुटूंबातील मंडळींचे निधन झाले. सन १९८२ ला दत्त जयंतीच्या शुभपर्वावर श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंडळ मोहाडीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीत भव्य नामजप महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यातील आमला विश्वेश्वर येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या गोपालकाला या विषयावर किर्तन झाले होते. त्यावेळी श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर शंभर पोत्याचा तांदळाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला जिल्ह्यातील व विदर्भातील भाविकांनी लाभ घेतला होता. तेव्हापासून सुप्रसिद्ध मॉ.चोंडेश्वरी प्रसिद्धीच्या झोतात आली. मॉ चोंडेश्वरी देवीचा चेहरा इतका मोठा आहे की, नऊवारी साडी घातल्यावर सुद्धा ती अपुरी पडते. बाकीचे पूर्ण शरीर जमिनीच्या आत आहे. मॉ चोंडेश्वरीदेवीचे डोळे, कान, नाक व मुख स्पष्ट दिसते. हा परिसर मोहाडीवासियांचे आराध्य दैवत बनले आहे. मॉ चोंडेश्वरीदेवी मंदिर परिसरात असणाºया विस्तीर्ण जागेचा कायापालट केला असून हे ठिकाण एक निसर्गरम्य ठिकाण झाले आहे. येथील तयार करण्यात आलेले बगीचा हे एक मंदिर परिसराचे आकर्षण ठरले आहे.

संपूर्ण मंदिर परिसरात वृक्षारोपण केल्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर बनला आहे. परिसरातील जनावरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गायमुख नदीच्या तिरावर मंदिर परिसरात आवारभिंतीचे बांधकाम करण्यात आले. वडाच्या झाडाजवळ बाहेर गावाहून येणाºया भाविकांसाठी राहण्याची व्यवस्थेसाठी हॉल बांधण्यात आले.मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हॅडपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या उजव्या बाजुला नवीन विहिरीचे बांधकाम व महिला-पुरुषांकरिता स्वच्छता गृहाचे बांधकाम करण्यात आले. त्याचप्रमाणे मंदिरात येणाºया भाविकाकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी पाईपलाईन जोडण्याचे कार्य प्रगतीपथावर सुरु आहे. नागपूरचे सुप्रसिद्ध शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला विशेषज्ञ प्रा.प्रमोद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली माता चोंडेश्वरीदेवीचे आकर्षक असे डोळे तयार करण्यात आले. त्यामुळे चोंडेश्वरीमातेच्या मुर्तीचे अधिकच आकर्षण वाढले आहे. मॉ चोंडेश्वरीदेवी मंदिर कमेटीची नुतन कार्यकारिणी तयार करण्यात आली. अध्यक्ष प्रेमरतन दम्मानी, उपाध्यक्ष एकानंद समरीत, सचिव रमेश गोन्नाडे, कोषाध्यक्ष बाळू बारई, सहसचिव हर्षल गायधने, कार्य.सदस्य उमाशंकर बारई, बाळु बारई, किशोर पातरे, संजय श्रीपाद, अशोक कारंजेकर, नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष विनोद पातरे यांच्या देखरेखेखाली मंदिराची कायापालट होत आहे. मंदिर कमेटी मंदिराच्या सभासद शुल्कातून व भाविकांच्या देणगीतून सन १९९८ ला पंचेचाळीस हजार चौरस फुट जागेभोवती परकोट व उंचसखल जागेचे सपाटीकरण करण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टीने मंदीरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मागील नवरात्रोत्सवात मुख्य गर्भागृहाचे व मुख्य मंदिराच्या विशाल सभामंडपासहित पुननिर्माणाचे बांधकाम सुरु आहे. तरी दानशुर दात्यांना मंदिर कमेटीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की, यशाशक्ती दान देवून मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात सहयोग करावे. जागृत मोहाडी मॉ चौण्डेश्वरी देवी मंदिरात, गणपतीमूर्ती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, शंकर भोलेनाथ व नंदीबैल मुर्ती आहेत. श्री.संत नारायण स्वामींचे चरण पादुका मंदिर आहे. अश्विन शुक्ल भाद्रपद नवरात्रोत्सवा निमित्त यात्रा भरत आहे. एकदा जाणीवपूर्वक नजर टाकल्यास मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. साजश्रृंगार करुन नववधुप्रमाणे हिरव्या वनराईचे दिसणारे विहंगमय दृश्य मनाला मोहून टाकते. प्रत्यक्ष आपण आल्याशिवाय उप:कालाची सृष्टिशोभा पाहण्याचा योग मात्र मोहाडीतच रात्रीच्याच्या वेळी रोशनाई तर डोळे दिपवून टाकणारी असते. यात्रेचे विशेष आकर्षण मनोरंजन लहानमुलांकरिता चक्कर झुले यात्रेत येतात. दरवर्षी नवरात्र उत्सव कमेटी भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करीत असते. आपण ही एकदा नवरात्रोत्सवात मोहाडीला येवून जमिनीतून प्रगट झालेल्या सुप्रसिद्ध जागृत मॉ चौण्डेश्वरी देवी मंदिराला भेट देऊन पहा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *