वाघांची संख्या घटण्यास अनेक कारणे आहेत!

वाघ म्हटले की अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.पण काळजाचा ठोका चुकवणारा हाच वाघ आज जगभरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.कारण जगभरात संख्येने लक्षवधी असलेल्या वाघांची संख्या आज काही हजारांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारनेही मग जागे होत वाघ वाचवा ही मोहीम हाती घेतली.या मोहिमेतूनच मग आंतरराष्ट्रीय वाघ दिन साजरा केला जाऊ लागला.जगातील सगळ्यात मोठा मांजरवर्गीय प्राणी म्हणजे वाघ. एकूण ३६ प्रकारच्या मांजर प्रजातींमधील वाघ हा जंगलाचा राजाच! त्याच्या गौरवार्थ आज २९ जुलै २०२३ हा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस म्हणून साजरा केला जातो.रशियातील सेंट पिटर्सबर्ग वाघ परिषदेत २९ जुलै २०१० साली आंतरराष्ट्रीय वाघ दिवस म्हणून घोषित केला गेला.बुध्दिवान, शक्तिवान,धूर्त,जंगल वास्तव्याला लागणारी सहनशक्ती व उमदेपणात ह्यया सम हाचह्ण असणाºया वाघाचे गारुड माणसाच्या मनावर कायमच राहिले आहे.

वाघाच्या एकूण सहा प्रजाती आहेत. बंगाल टायगर, सुमात्रा, टायगर, मलेशियन टायगर, सैबेरिया टायगर, इंडोचायनीज टायगर आणि कॅस्पियन टायगर. बंगाल टायगर भारताबरोबरच जवळच्या बांगलादेश,नेपाळ आणि पश्चिम म्यानमार येथे आहे. पांढरा वाघ बंगाल टायगरच्या रंगहीन प्रजातीत गणला जातो. सुमात्रा वाघ आणि पूर्व-दक्षिण चीनमधील वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पूर्व-दक्षिण चीनमधील वाघ फक्त प्राणी संग्रहालयात शिल्लक आहेत.इतर दोन प्रजाती बाली टायगर आणि जावा टायगर नामशेष म्हणून घोषित केले गेले आहेत. गेल्या शतकात एक लाख संख्येने असलेले वाघ शतकाअखेरचाळीस हजारपेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले.त्यामुळे त्यासंबंधी युद्ध पातळीवर काही करण्याची गरज भासत आहे.वाघांची चिंताजनकरित्या घटत चाललेली संख्या वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पिटसबर्ग परिषदेत पुतीन यांच्या पुढाकाराने अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र आले.नॅशनल टायगर कंजर्वेशनअथॉरिटी सांगते की २०१४ मध्ये अखेरची व्याघ्रगणना झाली.

त्यानुसार भारतात आजमितीला केवळ २हजार २२६ इतकेच वाघ आहेत.अर्थात २०१०च्या व्याघ्रगणनेच्या तुलनेत ही संख्या समधानकारक आहे. २०१० मध्ये तर वाघांची संख्या केवळ १हजार ७०६ इतकीच होती.आशा आहे की भविष्यातही वाघांची संख्या अशीच वाढत राहीन.वाघ संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाघांची घटणारी संख्या थांबविण्याच्या उद्देशाने सन २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय वाघ दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.सन २०१० मध्ये रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय वाघ दिनाबद्दल पहिल्यांदा घोषणा झाली. या परिषदेत २०२०पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.जगभरात वाघांची संख्या घटण्याची कारणे वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ)ने दिलेल्या माहितीनुसार,आज घडीला जगभरातील वाघांची संख्य केवळ ३ हजार ९०० इतकी आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीपासून जगभरातील वाघांची संख्या ९५टक्क्यांनी कमी झाली.१९१५ मध्ये वाघांची संख्या एक लाखांहून अधिक होती.वाघांची संख्या घटण्यास अनेक कारणे आहेत.यात बेसुमार जंगलतोड, वनांची संख्या घटने, निसर्गावर आक्रमण करुन मानवाने जंगलांमध्ये केलेला शिरकाव, उभारलेल्या इमारती,वाघाचे कातडे, नखे आणि शरीराच्या इतर अवयवांची केली जाणारी तस्करी आदी कारणांमुळे वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात घटत आहे.हयात असलेल्या आणि नामशेष झालेल्या वाघाच्या प्रजाती, आजघडीला साइबेरियन वाघ, बंगाल वाघ, इंडोचाइनीज वाघ,मलायन वाघ, सुमात्रन वाघआदी वाघांची प्रजाती जिवंत रुपात पाहायला मिळतात. तर बाली वाघ, कैस्पियन वाघ,जावन वाघ या प्रजातीतील वाघ पूर्ण नामशेष झाले आहेत. भारत जगात आदर्श दरम्यान,१९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी व्याघ्रसंवर्धनासाठी मोहीम सुरु केली. भारतातील वाघांचे संख्या वैज्ञानिक,आर्थिक, सांस्कृतिक आणि पारिस्थिक मूल्य अशा सर्व गोष्टींचे संवर्धन करणे हे य मोहिमेचे उद्दीष्ट होते.या मोहिमेमुळे आतापर्यंत ५० ठिकाणी व्याघ्रसंवर्धन प्रकल्प सुरु झाले आहेत.दरम्यान वाघ वाचविण्यासाठी जगाच्या तुलनेत भारताने प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यामुळे व्याघ्रसंवर्धन मोहिमेत भारत हा जगात आदर्श ठरला आहे. या परिषदेत २०२३ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले व त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यात आला. टायटॅनिक सिनेमाचा हिरो लिओनार्डो याने दहा लाख डॉलर्सचा निधी दिला आहे.

वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची अनेक करणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची अवैध शिकार. वाघाची हाडे,कातडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाम येथे मोठी मागणी आहे. मोठ्या आर्थिक फायद्यासाठीूड,कोळसा व कागदासाठी कापलेली जंगले तसेच,मनुष्य वस्तीसाठी साफ केलेली जंगले यामुळे वाघांना राहण्यायोग्य जंगले फक्त सात टक्के राहिली आहेत. त्याचबरोबर आहेत ती जंगले असूनही रिकामीच म्हटली पाहिजेत.कारण तिथे इतर प्राणी कमी होत आहेत.वाघांचे जंगलातील भक्ष्य म्हणजे हरीण,जंगली डुकरे,म्हैस,ग्वार,माकड इत्यादी.एक वाघ दर आठवड्याला एक हरीण किंवा ५० मोठे प्राणी वर्षभरात भक्ष्य म्हणून मारतात.बाजारात मांस विक्रीसाठी शिकारी मोठ्या प्रमाणात करीत असलेल्या अवैध शिकारींमुळे वाघांना भक्ष्य मिळेनासे होत आहे.

जंगलात वस्ती करून राहणाºया माणसांकडील पाळीव प्राणी वाघ पळवतात.त्यामुळे वाघांना मारण्यासाठी विविध उपाय योजले जातात. म्हणूनही वाघ संवर्धनात अडचणी येत आहेत. मध्यंतरी रशियातील अमूर वाघ प्रजातींना कॅनिन डिस्टेम्पर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक वाघ मृत्युमुखी पडले.अद्याप त्यावर ठोस उपाय सापडलेला नाही.समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आणत आहे. जंगलातील वणवे आणि मोठे पूर यामुळेही इतर वन्यजीवांबरोबर वाघही धोक्यात आले आहेत. वाघांचे नैसर्गिक आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते. वाघीण वयाच्या ३-४ वषार्नंतर वयात येते.ती एकावेळी फक्त २ ते ४ पिल्लाना जन्म देते. तसेच दुसºया पिलांना जन्म देण्याचा मधला कालावधी २ ते ३ वर्षांचा असतो.अशा नैसर्गिक गोष्टींमुळेही संख्या जास्त वाढू शकत नाही. वाघ नामशेष होण्यापासून वाचवायचा असेल आणि त्यांची संख्या वाढवायची असेल तर लोकजागृती हाच उपाय आहे.त्यासाठी २९ जुलै हा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जात आहे. कंबोडियातील टायगर अ‍ॅक्शन प्लॅन प्रमाणेच अनेक वन्य जीव वेल्फेअर आॅर्गनायझेशननी वाघ संवर्धनाची शपथ घेतली आहे. अनेक समारंभ साजरे करून तरुणांना त्यात सामील करून घेतले जात आहे. अतिदुर्गम भागातही वाघ वाचवण्यासाठी समाजमन तयार केले जात आहे. भारतात एकूण २५ वाघ अभयारण्ये उभारण्यातआली आहेत. तसेच,चार महत्त्वाचे वाघ संरक्षक प्रकल्प चालू आहेत. पूर्व-उत्तर,सुंदरबन, सारिसका आणि पश्चिमघाट असे चार वाघ संवर्धन प्रकल्प आहेत.

या उमद्या जंगलच्या राजाला वाचविण्यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून आपल्या परीने निश्चितच प्रयत्न करू शकतो.अप्रत्यक्षपणे वाघांच्या संवर्धनात आपल्यालाही हातभार लावता येईल.पामतेलाची मागणी वाढल्याने त्यासाठी जंगलतोड करून पामची झाडे लावली जात आहेत म्हणून पामतेल ज्यासाठी वापरले जाते अशी उत्पादने उदाहरणार्थ काही साबण,सौंदर्यप्रसाधने इतर पामतेलातील खाद्यपदार्थ आपण वापरण्यापासून लोकांना परावृत्त करू शकतो. कागदाचा अनावश्यक वापर टाळू शकतो. टॉयलेट पेपर,घराला व फर्निचरला लागणारे लाकूड यांचा वापर कमी करू शकतो.वृक्ष वाढण्याच्या वेगापेक्षा वृक्षतोडीचा वेग जास्त झाला आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. ‘फॉरेस्ट स्टिवॉर्डशिप कौन्सिल’ चे प्रमाणपत्र असलेला कागद व लाकडी वस्तू खरेदीसाठी जनजागृती करता येईल. हल्ली जंगल भटकंतीचा व त्यातही वाघ बघण्याचा लोकांचा उत्साह वाढलेला दिसतो. वाघ बघायचा असल्यास प्राणीसंग्रहालयात जाऊन बघता येईल.त्यासाठी वाघांच्या नैसर्गिक वातावरणात राहण्यावर गदा आणता कामा नये.

होता होईल तो वाघ प्रकल्पांना लागणारा निधी उभारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल. वाघांची संख्या आणि त्यांच्या संरक्षकांपुढील आव्हानांबाबत संपूर्ण जगात अधिक जागरूकता.भारत दर चार वर्षांनी जंगली वाघांची संख्या मोजतो आणि २००६ मध्ये १४११ वरून २०१४ मध्ये २२२६ पर्यंत आशाजनक वाढ दर्शवली आहे. भारतातील वाघांच्या वाढत्या लोकसंख्येचा कल खालीलप्रमाणे आहे. २००६ मध्ये १४११, सन २०१० मध्ये १७०६, सन २०१५ मध्ये २२२६, २०१९ मध्ये २९६७ मध्ये सन २०२३ मध्ये ३१६७ दि.१६ एप्रिल २०२३ मध्ये पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जगातील ७५ टक्के वाघांची संख्या भारतात असल्याचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधान पुढे म्हणाले की,भारतातील व्याघ्र प्रकल्प ७५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात आणि गेल्या दहा ते बारा वर्षांत देशातील वाघांची संख्या ७५ टक्क्यांनी वाढली आहे.

आज २९ जुलै आंतरराष्ट्रीय वाघ दिवसाला आपण सगळे वाघ संरक्षण व संवर्धनात आपला खारीचा का होईना वाटा उचलूयात.म्हणजे आपल्या पतवंडांना फक्त चित्रातच वाघ पाहण्याची वेळ येणार नाही!ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारापत्रिकाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वाघ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *