‘रन विथ पोलीस महामॅरेथान’ स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाने २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘रेझींग डे’ दिवस म्हणुन मान्यता दिली आहे. यानिमीत्त भंडारा पोलीस दलातर्फे दिंनाक २ जानेवारी ते ८ जानेवारी, २०२३ या कालावधी मध्ये पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्हयातील पोलीस स्टेशन स्तरावर शाळा तसेच महाविद्यालयात ‘रेझींग डे’ बाबत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस रेझींग डे निमीत्ताने आज दि.८ जानेवारी २०२३ रोजी रेल्वे मैदान, खात रोड भंडारा येथे भव्य मॅरेथान स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाला क्लिक टू क्लाऊड चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मिश्रा तसेच सारडा मेटल प्रा.लि. मुजबी चे पंकज सारडा यांच्यासह इतरही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनाकरीता क्लिक टू क्लाऊड चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मिश्रा तसेच सारडा मेटल प्रा.लि. मुजबी चे पंकज सारडा ,अनिकेत फत्तेसिंग चव्हाण,पुजा कंस्ट्रक्शन,आनंद कंस्ट्रक्शन,येलोरा पेपर मिल,जयप्रकाश शर्मा,स्टेट बँक आॅफ इण्डीया, शाखा भंडारा,बेटियां शक्ती फउंडेशन नागपुर, भारत पेट्रोलीयम, युनायटेड पेट्रोलीयम भंडारा,निकीता इंफ्रा., विवेकानंद अकृषक सहकारी पतसंस्था मर्या.

बारव्हा यांनी सहकार्य केले. स्पर्धेमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय, पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदार, यांनी भाग घेतला. त्यामध्ये १. नगर परीषद गांधी विद्यालय भंडारा २. मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दु. हाय. अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज भंडारा ३. जि. प. हाय. अ‍ॅन्ड ज्युनिअर जांब ४. जि. प. हाय. अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज आंधळगाव. ५. जि. प. हायस्कुल डोंगरगाव, ६. जि. प. हायस्कुल डोंगरी/ बुज, ७. जि. प. हाय. अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज नाकाडोंगरी, ८. जि. प. हायस्कुल चुल्हाड, ९. जि. प. हायस्कुल सिहोरा, १०. जि. प. हायस्कुल मिटेवानी, ११. जि. प. हायस्कुल देव्हाडी, १२. नगर परिषद माकडे हायस्कुल तुमसर, १३. नगर परिषद कस्तुरबा मुलीचे हायस्कुल तुमसर, १४. जि. प. हाय. अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज पोहरा, १५. जि. प. हायस्कुल मुरमाडी/ तुप, १६. जि. प. गांधी विद्यालय अ‍ॅन्ड ज्युनि. कॉलेज लाखनी, १७. जि. प. हायस्कुल धारगाव, १८. जि. प. जक्काद्दर ज्युनि. अ‍ॅन्ड हायस्कुल भंडारा, १९. जि. प. नूतन हायस्कल मुढरी/ बुज, २०. जि. प. हायस्कुल अ‍ॅन्ड सायन्स ज्यु. कॉलेज वरठी, २१. जि. प. हायस्कुल अ‍ॅन्ड आर्ट सायन्स ज्यु. कॉलेज पालोरा, २२. जि. प. हायस्कुल अ‍ॅन्ड ज्यु. कॉलेज मोहाडी, २३. जि. प. हायस्कुल करडी, २४. लाल बहादुर शास्त्री हायस्कुल भंडारा, २५. जकातदार माध्यमीक विद्यालय भंडारा. २६. मारोतीराव कावळे, विद्यालय, २७. रॉयल पब्लिक स्कुल, भंडारा, २८. गांधी विद्यालय पहेला, २९. जि. प. हायस्कुल वरठी, ३०. जे. एम. पटेल कॉलेज भंडारा, ३१. भागीरथा भाष्कर हायस्कुल, भंडारा, ३२. प्रगती महिला महाविद्यालय भंडारा, ३३. नुतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा, ३४. स्कुल आॅफ स्कॉर्लर, भंडारा, ३५. सेंट पिटर्स हायस्कुल बेला भंडारा यांनी सहभाग घेतला. ५ किमी महिला व पुरुष प्रथम पारीतोषीक १५,०००, द्दितीय पारीतोषीक १०,०००, तृतीय पारीतोषीक ५,००० तसेच व १० किमी प्रथम पारीतोषीक २५,०००, द्दितीय पारीतोषीक १५,०००, तृतीय पारीतोषीक १०,००० असे ठेवण्यात आले होते.

महामॅरेथान निमीत्त दौडस्पर्धेमध्ये हजर असलेल्या मनातील देशप्रेमाची भावना व उत्साह ओथंबुन वाहतांना दिसला. स्वागत समारोहाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा, कॉलेज, महाविद्यालय, पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदार, मॅरेथान स्पर्धेत भाग घेणाºया स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग व नियमांशी अवगत केले. सकाळी ०७.०० वा. जमलेल्या पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेकरीता मार्गस्थ केले. त्यानंतर दहा किलोमिटर दौड पुर्ण करण्याच्या ईरादयाने व स्पर्धकांचे मनोबल उंचावण्याकरीता पोलीस अधिक्षक लोहीत मतानी व अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी सुध्दा स्पर्धेमध्ये उत्फुर्तपणे सहभाग घेवुन दौड पुर्ण केली. सकाळी ७.०० वा. सुरु झालेली महामॅरेथान स्पर्धेचा ०८. १५ वा. शेवट झाला. ज्यात १० किमी पुरुष नागराज खुरसने यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर प्रमोदकुमार याने दुस- रा व अनिल कुमार यादव याने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच महिला स्पर्धकांमध्ये प्राजक्ता गोडबोले हिने प्रथक क्रमांक पटकवला. रुक्मीनी साहू हिने दुसरा क्रमांक पटकवला. व सलोनी हिने तिसरा क्रमांक पटकविला. त्याच प्रमाणे ५ किंमी मध्ये पुरुष प्राषिक थोटे यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर माहित शर्मा याने दुसरा क्रमांक तर गौरव खोडतकर यांने तिसरा क्रमांक पटकविला. मुली ५ किंमी. मध्ये आचल रमेश कडूकर हिने प्रथम क्रमांक, तर तृप्ती सुरेंद्र पटले हिने दुसरा तर अंजली मडावी हिने पटकविला. यावेळी कार्यक्रमाला आयपीएस श्रीमती रश्मीताराव मॅडम तुमसर, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी (गृह) विजय डोळस, जयवंत चव्हाण पो. नि. स्थागुशा, राजकुमार थोरात, पो. नि. पो. स्टे. कारधा, जिवीशा प्रदिप पुल्लरवार, सुभाष बारसे पो. नि. पो. स्टे. भंडारा, शिवाजी कदम, पो. नि. वाहतुक शाखा, अभिजीत पाटील सायबर सेल भंडारा, पो. उपनि. रमाकांत दिक्षीत, उद्योजक संस्था व इतर संस्थेचे प्रमुख व पोलीस विभाग यांनी अथक प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *