राज्यपाल रमेश बैस यांचा पिंगलेश्वरी मंदिर देवस्थान कमिटीकडून सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे दि.८ डिसेंबर रोजी भंडाºयात विकसीत भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाकरीता आले असता त्यांनी कोरंभी येथील पिंगलेश्वरी मंदिराला भेट दिली. यावेळी देवस्थान मंदिर कमिटीच्या पदाधिकाºयांनी राज्यपाल बैस यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी मंदिर गाभाºयात पिंगलेश्वरी मातेची विधीवत पूजा करुन आरती केली. त्यांचेशी देवस्थानाच्या विकासाबाबत चर्चा केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, खा.सुनिल मेंढे, आ.नरेंद्र भोंडेकर, माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके, जिल्हाधिकारी योगेश कुुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस हे विकसीत भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आटोपून कोरंभी येथे पिंगलेश्वरी मातेच्या दर्शनाकरीता पोहोचले. यावेळी देवस्थान कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थानाच्या कार्यालयात त्यांचेशी पिंगलेश्वरी मंदिर देवस्थानाचा विकासव्हावा.

या ठिकाणी नवरात्रोत्सवादरम्यान मोठी यात्रा भरत असून लाखोच्या संख्येने भाविक दूरवरुन पिंगलेश्वरी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या परिसराचा विकास व्हावा तसेच या देवस्थानाला ह्यबह्ण पर्यटनाचा दर्जा मिळावा, अशी मागणी करीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी पिंगलेश्वरी मातेचा पुरातन इतिहास देवस्थान कमिटीक-डून जाणून घेतला. मंदिरातील गाभाºयाात मातेची विधीवत पूजा-अर्चना करुन आरती केली. मंदिर परिसराची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. राज्यपाल यांनी मंदिर परिसरात भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रमोद गभणे, उपाध्यक्ष राजेंद्र सार्वे, सचिव शंकर सदावर्ती, सहसचिव दिनेश सार्वे, कोषाध्यक्ष राजू तिजारे, सदस्य मुरलीधर कडव, रामकृष्ण टांगले, धनंजय रायपुरकर, राहुल शेंडे, मुकेश कुथे, सोमेश्वर अतकरी, हितेश सार्वे, राहुल सदावर्ती, कोरंभी येथील सरपंच कुसूम कांबळे, उपसरपंच श्रध्दा लुटे, ग्रामसचिव वैद्य व मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम पुडके, प्रकाश धोटे, निरज मंदारी, प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *