लावणी कार्यक्रमात तरुणीचा अश्लील डान्स

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- झाडीपट्टीत दिवाळीनंतर गावागावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. लोककलेचा वारसा असलेल्या या उत्सवात आता काही गावांमध्ये डान्स हंगामाचा धुमाकूळ सुरू झाला असून बाहेर राज्याहून आणलेल्या नृत्यांगना सोबत अश्लील नृत्य केले जात आहे. असाच एक लज्जास्पद आणि किळसवाणा प्रकार तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावच्या डान्स हंगामात झाला असून डान्स करताना तरुणीने चक्क विवस्त्र होत अश्लीलतेचा कळस गाठला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात झाला. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे १८ नोव्हेंबर रोजी डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागपूर हून डान्स हंगामा पार्टीच्यानृत्यांगनांना पाचारण करण्यात आले होते. रात्री डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू झाला. सुरवातीला लावण्या आणि डान्स सुरू होते. हळूहळू कार्यक्रम रंगत गेला आणि रात्री २ वाजतानंतर कार्यक्रमाला अश्लीलतेचा रंग चढला.

या हंगामात नृत्य करणाºया एका तरुणीने एक एक करीत अंगावरील वस्त्र काढण्यास सुरूवात केली आणि क्षणातच ती विवस्त्र झाली. त्याच वेळी सोबतच्या तरुणाने सुध्दातिच्या सोबत अश्लील नृत्य करण्यास सुरवात केली. त्यामुळे तरुण मंडळी शिट्टया वाजवून रंगात आली. काही टवाळखोर तरुणांनी पैशांची उधळपट्टी करीत मंचाकडे येत या तरुणीची छेड काढण्यास सुरवात केली. काहींनी विवस्त्र तरुणीला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अश्लीलतेचा कळस गाठत डान्स करणारे तरुण तरुणी अचानक तोल जाऊन स्टेज खाली पडले. हा सर्व प्रकार शरमेने मान खाली घालावी लागणारा होता. या सर्व प्रकारचा कुणीतरी व्हिडीओ काढला. मात्र, दोन दिवस हा व्हिडिओ कुणाच्या हाती लागू नये याची काळजी घेण्यातआली. अखेर मंगळवारी हा व्हिडीओ एका गृपवर व्हायरल झाला.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कार्यक्रमाचे आयोजक किशोर मनिराम गौपाले रा. नाकाडोंगरी आणि आर. के. डान्स हांगामा ग्रुपच्या संचालक आहाके रा. नागपूर व सदस्य व प्रसार माध्यमावर व्हिडीओ वायरल झाल्याने मा. तहसिलदार सा. तुमसर यांचे परवाणगी पत्रामध्ये दिलेल्या अटिशतीर्चे उल्लंघन केल्याने फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरुन आरोपीतांविरुध्द गोबरवाही पोलीस ठाण्यात कलम ३५४ (ब), ५०९, २९४, ११४.३४ भादवी सहकलम ६७ मा.तं.का.सहकलम ११०, ११२, ११७, १३१ मपोका विविध कलामांतर्गत साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदणकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तुमसर ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *