घरफोडी करणाºया आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : घरफोडी करणाºया आंतरराज्यीय टोळी एका सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने २८ मार्च रोजी अटक केली. प्रदिप ऊर्फ दादू देवधर ठाकूर रा.डोगरगड असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४७ हजार रोख व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. तर इतर दोन आरोपीचा शोध पोलिस घेत आहे. देवरी येथे २६ मार्च रोजी महावीर राईस मिलच्या दरवाजाचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी ४ लाख ३८ हजार रुपये रोख, देवरी तालुक्यातील नवाटोला येथे अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करुन ६२ हजाराचा मुद्देमालआणि सडक अजुर्नी तालुक्यातील कोहमारा येथे दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी देवरी व डुग्गीपार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आला.

पोलिस निरीक्षक दिनेश लबडे व त्यांच्या पथकाने दोन वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरु केला. यादरम्यानघटनास्थळ ते डोंगरगडपर्यंत प्राप्त जवळपास ७० सीसीटीव्ही फुटेज अभ्यास, गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषण वरून प्रदिप ऊर्फ दादू देवधर ठाकूर याला डोंगरगड येथून अटक केली. त्याने नरेश महिलांगे व रणजीत यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्रदिप ठाकूर याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ३ लाख किमतीची चारचाकी जप्त केली असून याप्रकरणी आरोपीला देवरी पोलिसाच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणात समोर आलेल्या आरोपींवर गोंदियासह नागपूर व नागपूर शहर तसेच भंडारा जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहे. त्यामुळे या प्रकरणात इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *