ऑनलाइन जुगारावर धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांचे आदेशाने पोलिस स्टेशन लाखनी हद्दीत वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी आॅनलाईन जुगार अड्ड्यावर धाड घातली. या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असुन अन्य दोन आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले. महेश यशवंत गधे वय ४२ वर्षे व शेषराव वंजारी वय अंदाजे ४० वर्षे रा. मुरमाडी/ सावरी ता. लाखनी अशी पळुन गेलेल्या आरोपींची नावे असुन करुना महेश गंधे वय ३५ वर्षे व श्रीमती सत्यभामा यशवंत गंधे, वय ६५ वर्षे दोन्ही रा. वार्ड क्र. ८ शासकीय धान्य गोंडाऊन जवळ, लाखनी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यामुळे आॅनलाइन जुगार खेळताना पहिल्यांदाच महिलांना अटक करण्यात आल्याचे प्रकरण भंडारा जिल्ह्यात उघडकीस आले आहे. पोलीसांनी घटनास्थळावरून करुणा मेहश गंधे यांच्याकडुन अंगझडतीत कल्यान १९/९ असे आकडे ०५- ५०० व शेवटी ३/१० असे निळया पेनाने लिहले ,ओपो कंपनीचा असा असलेला आकाषी रंगाचा मोबाईल किंमती १० हजार रुपये. , एक विना झाकनाचा निळा पेन किं ३ रु. व नगदी २४५० असा एकुण १२ हजार ४५३ रूपयांचा मुद्देमाल तसेच श्रीमती सत्यभामा यशवंत गधे यांचे झडतीत मनिपुर सट्टापट्टीचे आकडे लिहलेले पांढरे कागद , आपो कंपनिचा मोबाईल किंमती १५ हजार व नगदी २५४० असा एकुण १७ हजार ५४३ रु. चा मुद्देमाल असा एकुण मिळुन २९हजार ९९६ रु. चा मुद्देमाल जप्त केला.आरोपींविरोधात पोलीस स्टेशन लाखनी येथे अप क्रमांक १८७/२०२२ कलम १२(अ) मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हवालदार गौरीशंकर कडव हे करीत आहेत. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात वरठी पोलीस स्टेशनचे वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम, पोलीस नायक आगाशे, मपोना मेश्राम, मपोना पोलीस शिपाई भालाधरे यांनी पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *