भूक लागल्यावरच तोंड उघडणे, हीच खरी सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली : डॉ. अविनाश सावजी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मानवाच्या जीवनशैलीत आज बराच बदल झाला आहे. त्याच्या राहणीमानासोबतच, खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून मानवाची ओळख असली, तरी तो आपल्या आरोग्याबाबत जागृत नाही. त्यामुळेच आज दुर्धर आजारांची संख्या वाढते आहे. आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भूक लागल्यावरच तोंड उघडा, असा सल्ला डॉ. अविनाश सावजी अमरावती यांनी दिला. प्रगती महिला कला महाविद्यालयात मराठी अभ्यास मंडळ, समाजशास्त्र अभ्यास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय विभाग, प्रगती कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि प्रगती समुपदेशन केंद्र तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅन्सर जनजागृती कार्यशाळेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री सातोकर उपस्थित होत्या. याप्रसंगी काजल टोपले, शिल्पाताई देवढे, ज्योतीताई साबळे, बाळ काळणे या कॅन्सर योध्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजार हा तनाला होतो, पण त्याचा स्पर्श मात्रमनाला होऊ देऊ नका. तनाचा आजार उपचारांनी बरा होतो, पण मनाला त्याची लागन झाली की, जीव जातो. म्हणून खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर असाध्य ते साध्य करता येते, असे सांगितले. यावेळी प्रदीप काकडे, अहमदनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी जितेंद्र देवकर, ओम नवले, श्रीकांत तिजारे, आसाराम भंवर, सौ. माधुरी तिजारे, सौ. नायगावकर, सौ. उईके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. क्रिष्णा पासवान यांनी केले तर उस्थितांचे आभार ग्रंथपाल प्रा. दुर्गाप्रसाद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गजानन कळंबे, डॉ. शालिक राठोड, डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, संजय वानखेडे, सुकेशिनी कुंभलकर, ज्योती ऊके, स्मिता उरकुडे, वृंदा गायधने यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी शंकांचे समाधान करीत चर्चेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *