साकोली नगर परिषदेतर्फे प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र शासनाने सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी २०१८ मध्ये अधिसूचना काढलेली आहे व त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर व जिल्हाधिकारी भंडारा यांनी सिंगल युज प्लास्टिक उत्पादन, वितरण, विक्री व वापर करणाºयांवर कडक कारवाई करणेबाबत निर्देश दिले आहे. मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी स्वप्नील हमाने ,कल्याणी भंवरे तसेच प्रकाश गेडाम लिपिक व इतर कर्मचारी यांनी प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करून सिंगल युज प्लास्टिक जसे प्लास्टिकचे ग्लास,प्लेट,थैली इत्यादी सामान अंदाजे रु २० हजार चे जप्त केले तसेच दोन दुकानदारांवर प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १० हजार रुपये चा दंड वसूल केला आहे. हि कारवाई अशीच चालू राहणार व साकोली मधील नागरिकांना कापडी पिशवी व प्लास्टिक विरहित साहित्याची सवय लागावी याकरिता नगर परिषद प्रयत्नशील राहणार आहे.पहिल्यांदा प्लास्टिक विक्री करताना आढळल्यास रु. ५ हजार दंड दुसºयांदा १० हजार व तिसºयांदा २५ हजार व गुन्हा दाखल करण्यात येईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *