गडकुंभली पर्यटनस्थळाचे भिजत घोंगडे कधीपर्यंत?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : निसर्गरम्य टेक- ड्या, तलाव व गडावर प्राचिन शिवमंदीर असे पर्यावरण सौंदर्य लाभलेला गडकुंभली पर्यटनस्थळ अद्यापही लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे उपेक्षित आहे. येथे सतत पर्यटकांचा ओढा असल्याने टेकडी खोदून एक खाजगी व्यवसायिक रिसॉर्टही तयार करण्यात आले. गडकुंभली पर्यटनस्थळ घोषित व्हावे ही मागणी वारंवार होत असताना त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. आतातरी पर्यटन मंत्र्यांनी लक्ष देऊन यंदाच्या पावसाळी अधिवेशनात गडकुंभली टेकडी परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी होत आहे.टेकडीवर जूने शिवमंदीर असून पायथ्याशी गडकुंभली हे गाव आहे. दोन निसर्गरम्य पहाडीच्या मधोमध तयार झालेला प्राचीन तलाव असून सर्वत्र हिरवळीची चादर पसरली आहे.

प्रत्येक महाशिवरात्रीला येथे भव्ययात्रा भरते. पुर्वी पश्चिम-पूर्व या तलाव मार्गाने आवागमन करणे सोयीचे होते. पण नंतर येथे तुली रिसॉर्ट तयार झाल्यान त्यांनी सुरक्षा भिंत उभारून हा मार्गच बंद केला. त्यामुळे आता महाशिवरात्रीला उत्तर-दक्षिण-पूर्व असा दीड ते दोन किलोमीटरचा तलावाला फेरा मारून भाविकांना मंदिरात जावे लागते. तलावच्या ठिकाणी पर्यटन वाढीच्या दृष्टिने जलतरण, बगिचा व इतर सुविधा तयार करण्याचाप्रस्ताव १९९८ मध्येच घेण्यात आला होता. पण पाणी कुठे मुरले कुणास ठावूक? पुढे काहीच झाले नाही व यासाठी आलेला विकासनिधी परत गेल्याचेही बोलले जात आहे. आता तर या निसर्गरम्य पहाडीचे अवशेष तोडून निसर्गसंपदा नष्ट केली जात आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी कारवाई करण्याची मागणी शहरातील निसर्गप्रेमी युवकांनी शासनाकडे केली. ही प्राचिन सौंदर्यनटीत टेकडी व ऐतिहासिक धरोहर टिकविण्यासाठी सांस्कृतिक व पर्यटनमंत्री यांनी गडकुंभली पर्यटनस्थळ घोषित करावा आणि विकासनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक निसर्गप्रेमींकडून होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *