तिरोडा पोलिसांनी केले १६ मोबाईल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : गडचिरोली येथील प्राध्यापिका तिरोडा येथील नातेवाईकांकडे कार्यक्रमाला आल्या असता अज्ञात चोरटयांनी त्यांचा वीस हजार रुपये किमतीचा जुना वापरलेला मोबाईल चोरून नेल्याचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी मोबाईल चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांचे मोबाईलसह आणखी १५ मोबाईल चोरट्यांकडून जप्त करण्यात आले.

गडचिरोली येथील सोशल वर्क महिला कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या सौ अनिता प्रीतम सिंग ठाकूर या १५ जुलै रोजी गांधी वार्ड तिरोडा येथील नातेवाईकांकडे कार्यक्रमाला आल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांचे पर्स मधील विवो कंपनीचा जुना वापरलेला मोबाईल किंमत वीस हजार चोरून नेल्याची तक्रार तिरोडा पोलिसात दिल्यावरून तिरोडा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांचे आदेशानुसार हवालदार नितेश बावणे, नायक पोलीस शिपाई ज्ञानोबा श्रीरामे, सूर्यकांत खराबे यांनी त्वरित हालचाल करून संशयावरून रोहित सत्यवान डोंगरे (२०) रा. नेहरू वार्ड तिरोडा व उत्कर्ष उर्फ छोट्या महेंद्र रामटेके (१९) रा. जगजीवन वार्ड तिरोडा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपण हा मोबाईल चोरला असून यासह आणखी पंधरा मोबाईल चोरी केल्याचे कबूल केल्यावरून तिरोडा पोलिसांनी या आरोपींकडून एकूण १६ मोबाईल किंमत २ लक्ष ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या आरोपींनी आणखी काही मोबाईल चोरण्याची शक्यता असल्याने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *