चारचाकी वाहनाची धडक, एक गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील चप्राड येथील युवक दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी साकोली वडसा रोड वर रोडच्या कडेला व्यायाम करीत असतात २४ जानेवारी रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान लाखांदूर कडून वडसाकडे जाणारी अज्ञात चार चाकी वाहनाने धडक देऊन एक गंभीर जखमी झाला असून इतर सात युवक थोडक्यात बचावल्याची घटना चपराळ सोनी गावा दरम्यान मुख्य महामार्गावर घडली .सध्या पोलीस भरती सुरू असल्याने येथील युवक मोठ्या प्रमाणात नियमित व्यायाम व सरावासाठी दररोज सकाळी धावणे,दंड बैठका, गोळा फेक याचा सराव करत असतात. राहुल विजय गिरीपुंजे २४ रा. चप्राड असे गंभीर युवकाचे नाव आहे. तर थोडक्यात बचावलेल्या मध्ये रोशन रामलाल कोराम २४, कुलदीप ऋषी ढोरे २३ ,कृष्णा आनंदराव हजारे २३, भूषणभोजराज शहारे २०, मुनेश्वर तुकडोजी शहारे २१, शुभम नानाजी मेश्राम १९ ,सचिन संतोष वाघमारे २१, रा.सर्व चप्राड या युवकांसह अन्य छोटे बालक सुद्धा घटनास्थळी होते. सदरचे चार चाकी वाहन सिमेंट काळपट रंगाची असून झायलो कंपनी असुन वडसा येथील नाटक कंपनीची असल्याची माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी युवकांनी दिली. जखमी युवकाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे भरती करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *