तलावात बुडून पशुपालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:-गावलागतच्या तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना(२५ जाने.) ला सकाळी ९.३० वाजता घडली. नंदकुमार बाळकृष्ण पटले(५२)वर्षे, रा. सालेभाटा, ता. लाखनी असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा शेतीसोबत पशुपालन करायचे.सकाळी साडेनऊ च्या सुमारास आपल्याकडील बैल धुण्यासाठी गावलागतच्या मामा तलावात गेला होता. काही वेळाने बैल घरी परत आले परंतु नंदकुमार हे घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता नंदकुमार हा मामा तलावाच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचे दिसुन आले. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल होत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय परीक्षणासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले. पोलिस स्टेशन लाखनी येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुरेश आत्राम करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *