व्यसनमुक्त व अंधश्रद्धेतून मुक्त समाज घडवायचा-लता बुरडे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : बाबांनी दिलेले चार तत्व, तीन शब्द, पाच नियम लक्षात घेता, दु:खी व कष्टी कुटुंब मोठया संख्येने पाहायला मिळत होते, बाबांनी दिलेले शिकवणीचा पालन करणारे कुटुंब आजही सुखी आहेत, परिस्थिती सुधारत आहे, दैवी शक्ती तासन्तास जागृत आहे, ती प्रत्येक सजिव आत्म्यात कार्य करत असते, त्यामुळे व्यसनमुक्त व अंधश्रद्धा मधून मुक्त होणारा समाज पाहायला मिळत आहे. असे कान्द्री येथील सेवक संमेलन मध्येआध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनी उदघाटिय मार्गदर्शन करताना सर्व सेवक सेविकांना सांगितले आहे. मोहाडी तालुक्यातील कांद्री या गावी भव्य असे सेवक संमेलन झाले.कार्यक्रमाच्या उद्घाटिका लता बुरडे आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारिका यांच्या शुभहस्ते पार पडले.

सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले.
बाबांच्या आईच्या प्रतिमेचे प्रतिमेला पूजन व मल्हार पण केले स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. तद्नंतर चर्चासत्राला सुरुवात झाली, कार्यक्रमाचे उदघाटक लता बुरडे आध्यात्मिक प्रमुख यांच्या शुभहस्ते पार पडले, कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले, प्रमुख पाहुणे माजी खा.मधुकर कुकडे, प्रमेश नलगोपुलवर, उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, रघुजी पुल्हारे, जि. प. सदस्य नरेश ईश्वरकर, पं. स. सदस्य उमेश भोंगाडे, गुरुदास शेंडे, रामभाऊ मोहतुरे, विलास शेंडे, रवी मरसकोल्हे, भगवान पिल्हारे, भास्कर निंबार्ते, लक्ष्मण माहुले, स्वप्नील बडवाईक, उपस्थित होते. योग्य झाकीला पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान पिल्हारे, सूत्रसंचालन उमेश भोंगाडे, तर आभार युवराज गलबले यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *