मान्य केलेल्या मागण्या तात्काळ द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : टोल नाका बंद झाल्यावर येथील कर्मचाºयांनी केलेल्या मागण्या देण्यात येतील असे मान्य करण्यात आले असतानाही टोल नाका बंद होवून एका महिन्याचा कालावधी लोटून गेल्यावरही मान्य केलेल्या मागण्या कर्मचाºयांना देण्यात आल्या नाही. सदर मान्य केलेल्या मागण्या तात्काळ देण्यात याव्या यासाठी येथील कर्मचाºयांनी अभिजीत अशोका टोल नाका मुख्य प्रबंधकाला निवेदन दिले आहे.

सदर निवेदनाची एक प्रत खासदार सुनिल मेंढे, आ. परीणय फुके, जिल्हाधिकारी कुंभेजकर, पोलीस अधिक्षक मतानी तसेच राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाला देण्यात आले आहे. निवेदनानुसार पाच वर्षापूर्वी २०१८ मध्ये टोल नाका बंद होणार आहे असा पत्र अभिजीत अशोका टोल नाका कंपनी ने लावला असता सर्व कर्मचारी वर्ग हे सर्व अभिजीत अशोका टोल नाका मुख्य प्रबंधकाकडे कडे आले असताना चालु महिन्याचा पगार सोडून तीन महिन्याचा पगार देण्यात यावा, १ एप्रिल २०२३ पासून ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतचा इन्क्रिमेंट देण्यात यावे तसेच पुर्ण बोनस देण्यात यावे, या सर्व कर्मचाºयांच्या मागण्या श्री गांधी साहेबांनी मान्य केले असता यावेळी तिथे श्री जैन साहेब, सिंग साहेब, सोनगडवाला साहेब, श्री लोखंडे साहेब हजर होते आणि सगळ्यांनी सर्व मागण्या मान्य केले होते आणि म्हटलं होतं कि सध्या टोल नाका बंद होणार नाही आणि जेव्हा बंद होइल तेव्हा वरील केलेल्या सर्व मागण्या कर्मचाºयांना हे देण्यात येतील.

मात्र दिनांक २७ सप्टेंबर २०२३ ला टोल नाका बंद झाल्यामुळे कर्मचाºयांच्या मान्य केलेल्या सर्व मागण्या देण्यात यावे हीच आग्रहाची विनंतीवजा मागणी असून टोल नाका बंद होवन एक महिन्याचा कालावधी लोटल्याने टोल नाक्यावरी सर्व कर्मचाºयांनी बुधवार दि. ४ आॅक्टोबर २०२३ रोजी खासदार सुनिल मेंढे, आमदार परीणय फुके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षकलोहित मतानी, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभाग तसेच अभिजीत अशोका टोल नाका कारधा येथील मुख्य प्रबंधकाला निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी उद्देश रामटेके, राजू कुकडकर, विक्की सोनेकर, रोशन सातपुते, श्रीनिवास मिश्रा, लक्ष्मीकांत मेश्राम, महेंद्र राय, दिपक साखरे, खुशाल धरमशहारे, संजय जाधव, किशोर वासनिक, राहूल रायपुरकर, ज्ञानेश्वर निंबार्ते, गणेश निर्वाण, अतुल हटवार, प्रमोद मेनवाडे, देवानंद लेंडारे, मनेज गजभिये, ग्यानिराम उईके, दिलीप कांबळे, सुनिल यादव, मोरेश्वर कुत्तरमारे, अरुण माकडे, विजयकुमार यादव, आशिष शुक्ला, महेश गभणे, राजकिरण गभणे, विनोद अंबादे, विनोद भोयर, शंकर निंबार्ते, रमेश कनोजे, सतिश चोपकर, रुपेश निंबार्ते, प्रमोद वैद्य, विकास पेशने, दिपक फटिंग, प्रशांत क्षिरसागर, अमीन शेख, प्रविण गोस्वामी, सुर्यकांत कानतोडे, विनोद अंबादे, जितेन्द्र गजभिये, मुकेश पालांदूरकर, नागेंद्र मेश्राम, सतिश कुरंजेकर, सुरेश नवखरे, राधेश्याम कळंबे, लिलाराम नागदेवे तसेच टोल नाका कारधा येथील इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.