विकास फाऊंडेशनचा आज मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : विविध विषयांना घेऊन विकास फाऊंडेशन तर्फे गुरूवारला दुपारी ११ वाजता माजी आ.चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर भुमीपुत्रांचा जनसुनावणी धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा चौंण्डेश्वरी माता मंदिर येथून निघणार आहे. मोर्च्यातील मागण्या मध्ये प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करुन देवून घरकुलाचे अनुदान २ लाख ५० २०२३ पासुन सुरू होणारे स्वच्छता कर रद्द करावे, शेतीसाठी लोडशेडींग बंद करुन ८ तास वरून दिवसा १२ तास वीज उपलब्ध करावे, जांब, आंधळंगाव, मोहाडी, रोहा पर्यंतचे मुख्य स्टेट हायवेचे लाईट त्वरित दुरूस्त करावे व काही खड्डे पडलेले आहेत.

ते त्वरित बुजवीण्यात यावे, राशन कार्डचे अन्न सुरक्षा योजनेचे धान्य ज्या गरजूंना मिळत नाही त्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, पावसाळयात अतवृष्टी झाल्याने पुरबाधीत घरमालक व शेतमालक यांना नुकसानीचे पैसे हजार रू. करण्यात यावे, खाजगी, शासकीय, निमशासकीय कामाना पाचशे रुपये प्रती ब्रॉस वाळू शासनाने उपलब्ध करुन द्यावी, पीएम किसान योजनेच्या योग्य लाभार्थ्यांना पैसे वसूलीचे दिलेले नोटीस रद्द करण्यात यावे, माती, मुरूमाची रॉयल्टी माफ करुन मंडळ अधिकारी यांना परवानगीचे अधिकार द्यावे, नगरपंचायत मोहाडीचे एप्रिल त्वरित देण्यात यावे, ईत्यादी मागण्याचा समावेश आहे. मोर्च्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन विकास फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ.युवराज जमईवार, तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, शहर अध्यक्ष अनिल न्यायखोर, मच्छीमार आघाडीचे अध्यक्ष सखाराम मारबते यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *