विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी प्रफुल पटेल सोबत आमदार राजु कारेमोरे यांचे वक्तव्य

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आमचे नेते प्रफुल पटेल हे असून विकासासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राच्या सरकार मध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय जनहिताचा असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. असे वक्तव्य तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार राजु माणिकराव कारेमोरे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प, विकासाचे कामे अडून आहेत, मनात इच्छा असूनही ते प्रकल्प पुर्णत्वास येत नव्हते. विशेष करून भंडारा/गोंदिया जिल्ह्यातील अनेक प्रकल्प सत्ता नसल्यामुळे अपूर्ण आहेत. भंडारा/गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण विकास होण्याचे दृष्टीने प्रफुल पटेल यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विकास करण्याच्या धडपडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प, समस्या मार्गी लागणार असून,अजित पवार व खा. प्रफुल पटेल यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय जनहितासाठी व जनतेच्या भल्याचा असल्यामुळे,आम्ही प्रफुल पटेल यांच्या सोबतीला खंबीरपणे उभे आहोत असे एका प्रसिद्धी पत्राद्वारे आ.राजु माणिकराव कारेमोरे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *