धान खरेदी योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : महसूल विभागाकडू न ई-पीक पाहणी पूर्ण झालेली नसल्याने शेतकºयांना त्यांचा आॅनलाईन ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होत असुन काही ठिकाणी भात कापणी चालू असल्याने मागील हंगामाच्या तुलनेत अद्यापही पुरेशी शेतकरी नोंदणी झाली नसल्याचे माजी विधान परीषद सदस्य परीणय फुके यांनी शासनाच्या निदर्शनास आणुन दिली. त्यानुसार शासनाने धान खरेदी योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ ७ जानेवारी, २०२३ पर्यंत देण्यात आली असुन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांनी त्याबाबदचे पञ निर्गमीत केले आहे. सविस्तर असे की, यंदाच्या खरीपात महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी पूर्ण झालेली नसल्याने शेतकºयांना त्यांचा आॅनलाईन ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होत असुन काही ठिकाणी भात कापणी चालू असल्याने मागील हंगामाच्या तुलनेत अद्यापही पुरेशी शेतकरी नोंदणी झाली नसल्याचे निदर्शनास आले. यंदाच्या खरीप हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी यासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणीबाबत प्रसिद्धी देण्यात आली होती. यापुर्वी ३० डिसेंबर पर्यंत शेतकºयांना नोंदणीसाठी वेळ दिली होती माञ ३० डिसेंबर रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कक्ष अधिकाºयांनी पञ निर्गमीत करुन येत्या ७ जानेवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकºयांना धान विक्रीसाठी मुदतवाढ मिळवून दिल्याबद्दल भंडा- रा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांनी आमदार परीणय फुके यांचे आभार मानले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *