पॅथालॉजी संचालकावर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानिक श्रीनगर कॉलनीतील नीपाने चौकात असलेल्या काव्या पॅथालॉजीच्या संचालकावर प्राणघातक हल्ला करून अनोळखी हल्लेखोर पसार झाला आहे. नीयोजीत प्राणघातक हल्ल्याने परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील सेंदूरवाफा येथील श्रीनगर कॉलनीतील नीपाने चौकात कन्हैयालाल नीपाने ४४ वर्ष याची काव्या पॅथालाजी आहे. दैनंदिनरित्या कन्हैयालाल २६ आक्टोबर रोजी रात्री दहा वाजता आपली पॅथालाजी बंद करीत असतांना अनोळखी व्यक्ती रक्ततपासणी करीता आला. त्याने रक्त तपासणी साठी कन्हैयालाल ला आग्रह केला असता कन्हैयालालने त्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन त्याच्या नावाची नोंदनी रजीस्टर वर करीत असतांना त्या अनोळखी व्यक्तीने कन्हैयालालवर चाकूनेअचानक चार-पाच ठिकाणी हल्ला केला. कन्हैयालालने आरडाओरड केली असता परीसरातील नागरिक धावून आले. या दरम्यान हल्लेखोर अनोळखी व्यक्ती घटना स्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जख्मी कन्हैयालाल ला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळ व जख्मी कन्हैयालाल ला उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील यांनी भेट दिली असून ठाणेदार जितेंद्र बोरकर व त्यांची चमू अनोळखी हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *