निकालानंतर सर्वच पक्षातर्फे सर्वाधीक सरपंच निवडीचे दावे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील एकूण ३०५ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवार दि.१८ डिसेंबर रोजी मतदान पार पडले त्याचा निकाल आज जाहिर करण्यात आला. त्यामध्ये निकालात आपल्याच पक्षाचे समर्थिक उमेदवारांचा विजय झाल्याचा दावा भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,शिवसेना शिंदे गट आदि पक्षांतर्फे करण्यात येत आहे.मात्र ग्राम पंचायत निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हांवरती होत नसल्याने नेमका कोण कोणत्या गटाचा हे सांगणे कठीणच आहे.आजच्या निकालात अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापीतांना धक्का दिल्याचेही दिसुन आले. तर अनेक ठिकाणचे निकाल हे आश्चर्यका-रक ठरले.मतमोजणी केंद्राबाहेर नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.विजयी गुलालाच्या उधळणाणे परिसर रंगेबिरंगी झाल्याचे दिसुन आले. एकीकडे विजयी उमेदवारांचा एकच जल्लोष बघायला मिळाला तर दुसरीकडे पराभुत उमेदवारमोकाटपणे मतमोजणी केंद्राबाहेर पडतांना दिसुन आले.त्याच्यासोबत असलेले मात्र त्यांना धिर देत समजुत काढत होते.

जिल्ह्यातील ३०५ ग्राम पंचायतीच्या सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांकरीता १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये तुमसर तालुक्यातील ७७, भंडारा ३९,पवनी ४१, साकोली ४६,लाखनी ५१ तर लाखांदुर तालुक्यातील ५० ग्राम पंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीत संपुर्ण जिल्ह्यात ७९.७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील दोन ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असुन ३०३ सरपंच पदाकरीता १०४९ उमेदवार निवडणुक रिंगणात होते तरजिल्ह्यातील २५५३ ग्राम पंचायत सदस्यांकरीता ५८८२ उमेदवारांनी निवडणुक लढविली .मतदानाच्या दिवसापासुन प्रत्यक पक्षातर्फे सर्र्वाधीक सरपंच व सदस्य निवडणुकीचा दावा केला जात होता मात्र उमेदवारांच्या मनामध्ये धाकधुक दिसुन येत होती.आज मात्र मतमोजणी नंतर हाती आलेल्या निकालाने सर्वच चित्र स्पष्ट केले असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच पक्षाचे समर्थीत सरपंच व सदस्यांचे संख्याबळ जास्त असल्याचा दावा केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *