उद्यापासून महागाईचे ओझे वाढणार; १ एप्रीलपासून या वस्तू होणार महाग!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : यंदाचे आर्थिक वर्ष आज संपत आहे. तरी अनेक वास्तूमध्ये उद्यापासून दरात वाढ होणार असल्याने नागरिकांनी आजच अनेक वस्तू खरेदी करून आपले पैसे वाचविण्याची एक संधी तुम्हाला आज आहे. कारण १ एप्रीलपासून आता वस्तूचे दरवाढ होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवरील महागाईचे ओझे वाढेल. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबरच, अनेक गोष्टी महाग होतील. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडेल. खरे तर, १ फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवर टॅक्स वाढविण्यात आल्याने त्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून याची अंमलबजावणी होईल.
काय स्वस्त होणार : १ एप्रिल २०२३ पासून अनेक गोष्टींवरील कस्टम ड्यूटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करून २.५ टक्के करण्यात आली आहे. यामुळे संबंधित वस्तूंच्या किंमतीत घसरण होईल. या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधित वस्तू, इलेक्ट्रिक कार, खेळणी, हिट कॉईल, डायमंड खेळणी, सिगारेट ज्वेलरी, बायोगॅसशी संबंधित काही गोष्टी, सायकल आदी गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय, १ एप्रिलपासून सोनेचांदी आणि यांपासून तयार होणाºया ज्वैलरी, प्लॅटिनम, इंपोर्टेड दरवाजे, किचनमधील चिमनी, परदेशी आणि एक्स-रे मशीन या वस्तू स्वस्त होतील. या वस्तूंवरील टॅक्स कमी करण्याची घोषणा १ फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
एलपीजी सिलिंडर : खरे तर, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीची समीक्षा केली जाते अथवा आढावा घेतला जातो. या १ एप्रिलला पेट्रोलियम कंपन्या किंमती वाढवू शकतात. यापूर्वी १ मार्चला कंपन्यांनीसिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर दिल्लीत सिलिंडरची किंमत ११०३ रुपये झाली. यापूर्वी ते १०५३ रुपयांना उपलब्ध होत होते. यावेळीही तेल कंपन्या सिलिंडरचे दर वाढवण्याची शक्यता आहे.
कारच्या किंमतीही वाढणार
जर आपण कार घेण्याचा विचार करत असाल तर, १ एप्रिलपासून तीही महाग होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प आणि मारुती या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ एप्रिलपासून लागू होतील. कंपन्यांकडून मॉडेलनुसार, किंमत वाढविली जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *